अपारंपारिक ऊर्जा क्षेत्राला अच्छे दिन, 2022 पर्यंत 15 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची शक्याता, रोजगार वाढणार

| Updated on: Dec 25, 2021 | 6:45 AM

गेल्या दोन वर्षांपासून जगावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनामुळे गुंतवणुकीला मोठा फटका बसला आहे. मात्र तरी देखील अपांरपारिक ऊर्जा क्षेत्रात मोठ्याप्रमामात गुंतवणूक होताना दिसत आहे. 2022 पर्यंत या क्षेत्रात अंदाजे 15 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची शक्यता आहे.

अपारंपारिक ऊर्जा क्षेत्राला अच्छे दिन, 2022 पर्यंत 15 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची शक्याता, रोजगार वाढणार
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून जगावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनामुळे गुंतवणुकीला मोठा फटका बसला आहे. मात्र तरी देखील अपांरपारिक ऊर्जा क्षेत्रात मोठ्याप्रमामात गुंतवणूक होताना दिसत आहे. 2022 पर्यंत अपांरपारिक ऊर्जा स्त्रोत जसे की, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, या सारख्या ऊर्जा प्रकारांमध्ये अंदाजे 15 अब्ज डॉलर म्हणजेच एक लाख कोटींच्या आसपास गुंतवणूक होण्याची शक्याता आहे. अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांमधून 175,000 मेगावॅट ऊर्जा निर्मितीचे लक्ष केंद्र सरकारकडून ठेवण्यात आले आहे.  या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी येणाऱ्या काळात अपांरपारिक ऊर्जा स्त्रोतांमधून वीज निर्मितीसाठी मोठ्याप्रमाणात गुंतवणुकीचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

प्रदूषणमुक्त विजेसाठी प्रयत्न

देशामध्ये असलेला विजेचा तुटवडा भरून निघावा. देशावरील वीज संकट दूर व्हावे. नागरिकांना प्रदूषणमुक्त वीज मिळावी यासाठी केंद्राकडून प्रयत्न सूरू आहेत. याच पार्श्वभूमीवर अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतापासून वीज निर्मितीवर जोर दिला जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांपासून 150,000  मेगावॅट ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले होते. मात्र आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. 2022 पासून अपांरपारिक ऊर्जा स्त्रोतापासून 175,000 मेगावॅट ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. वीज निर्मिती वाढवण्यासाठी या क्षेत्रात सरकारकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येत आहे.

2030 पर्यंत 500 गीगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट

येत्या 2030 पर्यांत अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांमधून 500 गीगावॅट पर्यंत ऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट केद्र सरकारकडून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या क्षेत्रात भरीव गुंतवणूक करण्यात येत आहे. तसेच अनेक खासगी कंपन्यांना देखील या क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केंद्रकडून करण्यात आले आहे. या क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना केंद्राकडून आकर्षक सवलती मिळत असल्याने, अनेक खासगी कंपन्यांनी देखील या क्षेत्रात गुंतवणुकीला सुरुवात केली आहे. येणाऱ्या काळात या क्षेत्रात मोठ्याप्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्याता आहे.

संबंधित बातम्या 

EPFO : वाचवायचे असतील लाखो रुपये तर 31 डिसेंबरपूर्वी करा ‘ईपीएफओ’शी संबंधित ‘हे’ काम…

सेमीकंडक्टर समस्येचा अंत ‘वेदांत’ ! साठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार, अनिल अग्रवाल यांची मोठी घोषणा  

Insurance Premium : विम्याचा हप्ता वर्षभरात दुसऱ्यांदा वाढणार, काय आहे तज्ज्ञांचं मत?