नवी दिल्ली, दिवाळीनंतर पीएफ खातेधारकांना आनंदाची बातमी मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार लवकरच पीएफ खातेधारकांना त्यांच्या खात्यातील व्याजाची रक्कम देणार आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात EPFO कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. नवरात्रोत्सवापासून पीएफ खातेधारकांना व्याजाची रक्कम त्यांच्या खात्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र आता दिवाळीनंतर त्यांची आशा पूर्ण होणार आहे. खात्यात जमा केलेल्या रकमेवर सरकार 8.1 टक्के व्याज देईल.
कंपनी आणि कर्मचारी यांच्याकडून पीएफ खात्यात पैसे जमा केले जातात. यामध्ये, 24% बेसिक आणि डीएसह जमा केले जाते. तुमची पीएफ रक्कम दरमहा जमा केली तरी त्यावर वार्षिक व्याज मिळते.
तुम्हाला पीएफ खात्यातील रक्कम तपासायची असेल, तर सर्वप्रथम ईपीएफओच्या वेबसाइटवर जा.
येथे आमच्या सेवांवर जा आणि कर्मचार्यांसाठी क्लिक करा.
त्यानंतर सदस्य पासबुकवर क्लिक करा. UAN नंबर आणि पासवर्ड सबमिट करून लॉग इन करा.
आता पीएफ खात्याचा पर्याय निवडा. येथे तुम्हाला शिल्लक दिसेल.
तुम्ही एसएमएस पाठवूनही खात्याची माहिती मिळवू शकता.
यासाठी नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून EPFOHO UAN ENG टाइप करा आणि 7738299899 वर एसएमएस करा. संदेशातील शेवटची तीन अक्षरे भाषेसाठी आहेत. तुम्हाला हिंदीत माहिती हवी असल्यास HIN टाइप करा.