नवी दिल्ली : मागील वर्ष 2021 हे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी समाधानकारक राहिले. काही प्रमाणात शेअर बाजारात चढ-उतार पहायला मिळाली. मात्र गेल्या वर्षी सेन्सेक्सने उच्चांक गाठत साठ हजारांचा टप्पा देखील पार केला. गेल्या वर्षी विविध कंपन्यांच्या शेअरमधून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळावा. गेल्या तीन वर्षांपासून शेअर बाजारातून चांगला परतावा मिळत असल्याने गुंतवणूकदरांची संख्या वाढत आहे. मागील तीन वर्षांमध्ये डिमॅटच्या खात्यात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांचा अंदाज पहाता नवे वर्ष शेअरबाजारासाठी कसे राहणार, तज्ज्ञ काय म्हणतात हे आपण जाणून घेणार आहोत.
2021 या संपूर्ण वर्षात शेअर बाजारात तेजी पहायला मिळाली. सप्टेंबर महिन्यात तर सेन्सेक्सने आतापर्यंतचा उच्चांक गाठत 62 हजारांपर्यंत मजल मारली. या काळात अनेक कंपन्यांचे शेअर प्रचंड वधारले. तसेच शेअर बाजारातून चांगला परतावा मिळाल्याने गुंतवणूकदार देखील मालामाल झाले. गेल्या वर्षी 2020 च्या तुलनेमध्ये सेन्सेक्समध्ये तब्बल 10502 अंक म्हणजेच 24 टक्क्यांची वाढ झाली, तर मार्केट कॅपमध्ये देखील मोठ्याप्रमाणात वाढ झाली. मार्केट कॅपमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे वाढत जाणारी गुंतवणूकदारांची संख्या हे आहे.
‘स्टँडर्ड चार्टर्ड’च्या अंदाजानुसार चालू वर्षात शेअर बाजारातून मिळणारा परतावा हा तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतात त्यावर अवलंबून असेल. म्हणजेच काय तर शेअरचे मार्केटमधील भवितव्य हे संबंधित कंपनीच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे. चालू वर्षात शेअरमार्केटमध्ये गेल्या वर्षी प्रमाणेच तेजी-मंदीचे वातावरण राहू शकते. मात्र या सर्वांवर मात करत शेअर बाजारातून गुंतवणूकदारांना मार्केटमधून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. विविध संस्थांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार चालू वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही मजबून राहणार आहे. जीडीपी 10 च्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्याचा देखील शेअर मार्केटवर सकारात्मक परिणाम होण्याची चिन्हे आहेत. मात्र देशात सातत्याने वाढत असलेल्या महागाईमुळे थोडे चिंतेचे वातावरण राहू शकते. बाकी येणारा काळ हा शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी अतिशय अनुकून असून, गुंतवणुकीपूर्वी अभ्यास केल्यास किंवा जाणकारांचा सल्ला घेतल्यास चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा आहे.
आता ग्राहकच राजा, उत्पादनातील दोषाची बिनधास्त करा तक्रार , खटल्यांचा निकाल ही लागणार झटपट
2021 मध्ये पेट्रोल 14 तर डिझेल 17 टक्क्यांनी महागले; पुढील वर्षात इंधनाचे दर कमी होणार?
‘लिबोर’ पर्वाचा अस्त: कर्ज दर निश्चितीची नवी संरचना, स्टेट बँक बदलासाठी सज्ज