मालवाहतुकीच्या क्षेत्रात रेल्वेची जोरदार मुसंडी; एका क्लिकवर मिळणार गोदाम आणि लोकेशनची माहिती

| Updated on: Aug 01, 2021 | 9:48 AM

Indian Railway | भारतीय रेल्वेच्या www.ecr.indianrailways.gov.in/ या संकेतस्थळावर व्यापाऱ्यांना गोदाम, ठिकाण आणि मालवाहतुकीचे इतर सर्व तपशील उपलब्ध करुन दिले जात आहेत.

मालवाहतुकीच्या क्षेत्रात रेल्वेची जोरदार मुसंडी; एका क्लिकवर मिळणार गोदाम आणि लोकेशनची माहिती
मालवाहतूक
Follow us on

नवी दिल्ली: संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना भारतीय रेल्वेने आपल्या कामाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोरोनाच्या काळात भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या माध्यमातून रेकॉर्ड ब्रेक उत्पन्नाची कमाई केली आहे. यासाठी रेल्वेने आपले संपूर्ण लक्ष या क्षेत्रावर केंद्रित केले.

सध्याच्या घडीला रेल्वेकडून शेतमाल, मासे, दुग्धजन्य पदार्थांची स्वस्तात वाहतूक केली जाते. याशिवाय, धान्य, खाद्यान्न आणि अन्य गोष्टींचीही रेल्वेकडून मोठ्याप्रमाणावर वाहतूक केली जाते. देशभरात मालगाड्यांसाठी विशेष मार्गिका तयार करण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे तर भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या संपूर्ण कारभार ऑनलाईन व्यासपीठावर आणला आहे.

भारतीय रेल्वेच्या www.ecr.indianrailways.gov.in/ या संकेतस्थळावर व्यापाऱ्यांना गोदाम, ठिकाण आणि मालवाहतुकीचे इतर सर्व तपशील उपलब्ध करुन दिले जात आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध होऊन बुकिंगचे प्रमाण वाढले आहे.

मे महिन्यात मालवाहतुकीच्या माध्यमातून विक्रमी उत्पन्न

यंदाच्या मे महिन्यात भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या माध्यमातून विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. मे महिन्यात रेल्वेने 114.8 मिलियन टन मालाची वाहतूक केली. या माध्यमातून रेल्वेला 11604.94 कोटी रुपये मिळाले होते.

मालवाहतुकीमध्ये प्रामुख्याने कोळसा, लोह, खाद्यपदार्थ, खनिज तेल आणि सिमेंटचा समावेश आहे. गेल्या काही काळापासून भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न वाढवण्यावर विशेष लक्ष दिले आहे. मालगाड्यांचा वेगही वाढवण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.

संबंधित बातम्या:

कोरोनाकाळात भारतीय रेल्वेची चांदी; भंगार विकून कोट्यवधींची कमाई

भारतीय रेल्वेला अच्छे दिन, मे महिन्यात ‘या’ कारणामुळे कोट्यवधींची कमाई

रेल्वेचा झिरो बेस्ड टाईमटेबल काय आहे? प्रवाशांवर काय परिणाम होणार ?