Google Pay ची भन्नाट ऑफर, तुम्ही सुद्धा जिंकू शकतात 1001 रुपये, जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Nov 01, 2024 | 8:43 PM

Google Pay Diwali Offer : गूगल पे या कंपनीने यूजर्सला 1001 रुपयांपर्यंतच कॅशबॅक जिंकण्याची ऑफर दिली आहे. ही ऑफर अद्याही सुरु आहे. तुम्ही आजदेखील या ऑफरचा फायदा घेऊ शकणार आहात. पण ही ऑफर आता लवकरच समाप्त होणार आहे. ही ऑफर किती दिवस आहे आणि त्याचा फायदा कसा घ्यायचा? या विषयी आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.

Google Pay ची भन्नाट ऑफर, तुम्ही सुद्धा जिंकू शकतात 1001 रुपये, जाणून घ्या सविस्तर
Google Pay ची भन्नाट ऑफर, तुम्ही सुद्धा जिंकू शकतात 1001 रुपये, जाणून घ्या सविस्तर
Follow us on

देशभरात सध्या दिवाळीचा उत्साह आहे. दिवाळीच्या निमित्ताने वेगवेगळ्या कंपन्यांकडून वेगवेगळी ऑफर दिली जाते. सध्या तर यूपीआय पेमेंट्सचा जमाना आहे. शक्यतो आता अनेकजण ऑनलाईन यूपीआय पेमेंट करणं जास्त रेफर करतात. विशेष म्हणजे फेस्टिवल सीजनला खास करण्यासाठी गूगल पे ने काही दिवसांपूर्वी एक भारी ऑफर सुरु केली आहे. गूगल पे या कंपनीने यूजर्सला 1001 रुपयांपर्यंतच कॅशबॅक जिंकण्याची ऑफर दिली आहे. ही ऑफर अद्याही सुरु आहे. तुम्ही आजदेखील या ऑफरचा फायदा घेऊ शकणार आहात. पण ही ऑफर आता लवकरच समाप्त होणार आहे. ही ऑफर किती दिवस आहे आणि त्याचा फायदा कसा घ्यायचा? या विषयी आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.

नेमकी ऑफर काय?

‘गूगल पे’च्या या ऑफरसाठी आपल्याला 6 वेगवेगळ्या प्रकारचे लाडू गोळा करावे लागतील. अधिकृत साईटकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गूगल पे युजर्सला 51 रुपयांपासून 1001 रुपयांपर्यंत कॅशबॅक करत आहे. प्रत्येक जण हे कॅशबॅक जिंकू शकणार आहे. तुम्ही जर नियमितपणे गूगल पेच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट करत असाल, तुम्ही नियमित गूगल पे वापरत असाल तर तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकतात. कॅशबॅकसाठी तुमच्याकडे 6 लाडूंपैकी 1 लाडू तरी असायला हवा. ही ऑफर 21 ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. या ऑफरचा फायदा तुम्ही 7 नोव्हेंबर 2024 पर्यंत घेऊ शकणार आहात. याचाच अर्थ तुम्ही अजूनही सात दिवस या योजनेचा फायदा घेऊ शकणार आहात.

लाडू कसे मिळवावेत?

आपण कोणत्याही मर्चेंटवर यूपीआयच्या माध्यमातून कमीत कमी 100 रुपयांचं ट्रान्झॅक्शन करता तर तुम्हाला लाडू मिळू शकतो. याशिवाय यूपीआयच्या माध्यमातून मोबाईल फोनंच रिचार्ज किंवा पोस्टपेड बिल पेमेंटवरही तुम्हाला लाडू मिळू शकतो. यूपीआयच्या माध्यमातून कमीत कमी 3 हजार रुपयांचं क्रेडिट कार्ड बिल भरल्याने किंवा कमीत कमी 200 रुपयांचे पार्टनर ब्रँड्स गिफ्ट कार्ड खरेदी केल्यानेदेखील लाडू मिळणार आहेत.

हे सुद्धा वाचा

आपल्याला जर माहिती मिळवायची आहे की, आपल्याकडे किती लाडू आहेत? त्यासाठी तुम्हाला गूगल पे अॅप उघडावं लागेल. त्यानंतर ऑफर्स आणि रिवॉर्डच्या सेक्शना Laddoos हे ऑप्शन दिसेल. तुम्हाला तिथे क्लिक करावं लागेल. तिथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल की, तुम्ही किती लाडू जमा केले आहेत आणि किती अजून जमा करायचे आहेत. या ऑफरशी संबंधित सर्व माहिती आपल्याला https://support.google.com/pay/india/answer/15544235 इथे मिळून जाईल.