Government Scheme : जर तुमची पत्नी गृहिणी आहे आणि अशातच पत्नीसाठी तुम्हाला भविष्यात काहीतरी तरतूद करायची आहे तसेच तुम्हाला जर वाटत असेल की आपली पत्नी (Wife) भविष्यात आर्थिक रुपाने निर्भर असायला हवी तर तुम्ही अगदी योग्य विचार करत आहात. केंद्र सरकारने एक नवीन स्कीम तुमच्यासाठी आणलेली आहे. या स्कीमच्या अनुषंगाने जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने बँकेमध्ये खाते उघडत असाल तर तुम्हाला भविष्यात खूप सारा फायदा मिळू शकतो.या स्कीमच्या माध्यमातून तुमची पत्नी दर महिन्याला (Per Month) अंदाजे 44,793 रुपये कमवू शकते.या स्कीमचे नाव आहे NPS. ही स्कीम एका प्रकारची पेंशन प्लॅन आहे ज्यामुळे भविष्यात तुमची खूप सारी कमाई होईल.
या स्कीममध्ये तुम्ही दर महिन्याला किंवा वर्षाला पैसे जमा करु शकतात, विशेष बाब म्हणजे या स्कीम मध्ये तुम्हाला फक्त 1000 रुपये जमा करायचे आहेत सोबतच तुम्ही पत्नीच्या नावावर NPS हे खाते उघडू शकतात. वयाच्या 60 वर्षी हे खाते मॅच्युअर होऊन जाते आणि नवीन नियमानुसार तुम्हाला हवे असल्यास वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत तुम्ही हे खाते वापरू शकतात.
जर तुमच्या पत्नीचे वय 30 वर्षे आहे आणि तुम्ही त्यांच्या या खात्यामध्ये दर महिना 5000 रुपये गुंतवणूक करतात तर अशावेळी वर्षाला या रकमेवर 10 टक्के व्याज रिटर्न मिळते तसेच वयाच्या 60 वर्षी त्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत 1.12 कोटी रुपये जमा होतील. या रकमेतील त्यांना अंदाजे 45 लाख रुपये मिळतील याशिवाय त्यांना दर महिन्याला 45,000 रुपयांच्या आसपास पेन्शन सुद्धा मिळेल. या स्कीमची सर्वात विशेष बाब म्हणजे त्यांना ही पेन्शन आजीवन मिळेल.
या स्कीममध्ये गुंतवणूक केल्यानंतर मिळणारे रिटर्नचे गॅरेंटेड पर्सेंटेज फिक्स नसतात परंतु जर आतापर्यंतचे रेकॉर्ड जर पाहिले गेले तर गुंतवणूकदारांना साधारणतः 10 ते 11टक्के पर्यंत रिटर्न मिळू शकतो.
या स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी जेव्हा पात्रताबद्दल विचार केला जातो तेव्हा या स्कीममध्ये वय वर्ष 18 ते 65 मधील कोणताही भारतीय नागरिक हे खाते बँकेमध्ये जाऊन उघडू शकतो. एक व्यक्तीला फक्त एकच NPS खाते उघडू शकतो या खाते प्रकारांमध्ये जॉइंट खाते नसते.
या स्कीमच्या अंतर्गत तुम्ही दोन प्रकारे खाते उघडू शकतात, यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे टीयर-1 ऑप्शन. टीयर-1 खात्यामध्ये आपण किती ही पैसे जमा करून ते पैसे कालावधीच्या आधी आपण पैसे काढू शकत नाही. जेव्हा या स्कीम ची मुदत कालावधी संपते तेव्हा तुम्ही सर्व पैसे काढू शकतात. टीयर-2 या प्रकारचे खाते उघडण्यासाठी तुम्हाला आधी टीयर 1 चे खाते धारक असणे अनिवार्य आहे. ह्या प्रकारच्या खात्यामध्ये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पैसे काढू शकता किंवा पैसे जमा सुद्धा करू शकतात. हे खाते सर्वांनाच उघडणे अनिवार्य नाही.
टिप : (येथे टीव्ही9 News द्वारा आम्ही कोणत्याही स्कीममध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला अजिबात देत नाही. ही माहिती फक्त तुम्हाला कळावी म्हणून सांगत आहोत तसेच जर तुम्ही या स्कीममध्ये कोणत्याही प्रकारे पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर त्या आधी एक्सपर्ट सल्ला अवश्य घ्या.)
असंघटित कामगारांसाठी ई-श्रम कार्ड, नोंदणीची शेवटची तारीख काय, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं
महिन्याला पाच हजार रुपये जमा करा आणि मिळवा 15 लाख रुपये, जाणून घ्या सर्वकाही