GST समितीच्या बैठकीत महत्वाचे निर्णय, जाणून घ्या कोणत्या वस्तू झाल्या स्वस्त?
GST council Meeting | जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत समाविष्ट करण्यास नकार देण्यात आला. जीएसटी परिषदेच्या 45 व्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
-
-
जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत समाविष्ट करण्यास नकार देण्यात आला. जीएसटी परिषदेच्या 45 व्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये कोरोना औषधांवर जीएसटी सूट वाढवून 31 डिसेंबर 2021 करण्यात आली. घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांतर्गत अनेक गोष्टींवरील जीएसटी दर कमी करण्यात आला. जीएसटी स्लॅबमध्ये बदल झाल्याने अनेक गोष्टी स्वस्त आणि महाग झाल्या आहेत.
-
-
Swiggy, Zomato सारख्या कंपन्यांच्या फूड डिलिव्हरीवर GST भरावा लागेल. पूर्वी Swiggy आणि Zomato सारख्या एग्रीगेटर कंपन्या, ज्या रेस्टॉरंट्समधून ऑर्डर पिक करायच्या त्यांना कर भरावा लागत असे. मात्र, आता Swiggy, Zomato या कंपन्यांनाही जीएसटी भरावा लागणार आहे.
-
-
पुढील एका वर्षासाठी जहाज किंवा विमानाने निर्यात मालाच्या वाहतुकीवर जीएसटी लागणार नाही. जीएसटी पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाडामुळे निर्यातदारांना इनपुट टॅक्स क्रेडिट परतावा मिळण्यात अडचणी येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. मालवाहतूक करणाऱ्या ट्रक्सना राष्ट्रीय परवाने देण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कावर जीएसटी लावला जाणार नाही.
-
-
रेल्वे भाग आणि लोकोमोटिव्हवरील जीएसटी 12% वरून 18% पर्यंत वाढला.
-
-
कोरोनाशी संबंधित औषधे आणि रुग्णवाहिकांसह इतर उपकरणांवरही करांचे दर कमी करण्यात आले. बैठकीत कोविडच्या लसीवर 5% जीएसटी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी दरातील ही कपात डिसेंबर 2021 पर्यंत लागू राहील. औषधांवरील जीएसटी दर Amphotericin B (0%), Tocilizumab (0%), Remdesivir (5%), Heparin (5%) असा राहील.
-
-
भाडेतत्त्वावरील विमानांच्या आयातीवरील IGST रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या हवाई कंपन्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.
-