नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात वर्क फ्रॉम होम संकल्पना मोठ्या प्रमाणावर अंमलात आली आहे. वर्क फ्रॉम होम सुरु झाल्यानं शहरी भागात घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरात ऑफिससारखी व्यवस्था जागा अपुरी पडू लागल्यानं अनेकांचा नवीन घर घेण्याकडे कल वाढला आहे. 25 ते 45 वयोगटातील कर्मचारी नवं घर खरेदी करत आहेत. कर्मचाऱ्यांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी कंपन्या लोन-टू- वॅल्यूच्या तुलनेत मासिक हप्त्यांची संख्या वाढवून कमी डाऊन पेमेंटमध्ये घर खरेदी करत असल्याचं समोर आलं आहे. (Home loan new trend how to reduce down payment and EMI amount with loan to value trick)
रिअल इस्टेट प्लॅटफॉर्म नो ब्रोकरनं केलेल्या सर्व्हेनुसार अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची सुविधा दिली आहे. यामुळे मध्यम वयोगटातील कर्मचारी कमी व्याज दर आणि मोठ्या कालावधीसाठी गृह कर्ज घेऊन घर खरेदी करत आहेत. यासाठी एलटीवी म्हणजेच लोन-टू- वॅल्यू कमी ठेवत आहेत. नो ब्रोकरनं जवळपास 1200 हून अधिक घर खरेदीदारांचा सर्व्हे केला आहे.
नोब्रोकरनं केलेल्या सर्व्हेनुसार घर खरेदी करणाऱ्यापैकी 31 टक्के ग्राहकांनी गृह कर्जाचा कालावधी 10-15 वर्षांपेक्षा अधिक असावा, असं मत नोंदवलं आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी जादा असल्यानं घरावर मिळणाऱ्या कर्जाची रक्कम वाढते. यामुळे कमी डाऊनपेमेंट भरुन घर खरेदी करत आहेत. 24 टक्के ग्राहकांना 10 वर्षांपेक्षा अधिक काळ कर्जाचा असावा, अशी प्राथमिकता दिली आहे. मध्यम वयोगटातील जवळपास 65 टक्के ग्राहक आयटी क्षेत्रात किंवा स्वंयरोजगार करतात.
बँक गृह कर्जाची रक्कम ठरवताना घराचं मूल्यांकन करते आणि त्यानंतर त्यावर किती कर्ज द्यायचं याविषयी निर्णय घेते. तुम्ही जी मालमत्ता खरेदी करणार आहात त्या मालमत्तेवर जितके कर्ज मिळेल त्याला लोन टू वॅल्यू म्हटलं जातं. एलटीवीमध्ये कर्जाचा परतफेडीचा कालावधी जादा असतो आणि डाऊनपेमेंट देखील कमी भरावं लागतं, यामुळे ग्राहक जादा किंमत असणारं घर खरेदी करु शकतात. डाऊनपेमेंट कमी असल्यामुळे ईएमआयची संख्या वाढते.
नो ब्रोकरनं केलेल्या सर्व्हेनुसार घर खरेदी करणाऱ्यांची संख्या 49 टक्केंवरुन वाढून 63 टक्केंवर पोहोचली आहे.2021 च्या पहिल्या तिमाहीत 2020 च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत घर खरेदीदारांची संख्या वाढली आहे. बंगळुरु , चेन्नईमध्ये 41 आणि 47टक्के विक्रीमध्ये वाढ झाली आहे. हैदराबादमध्ये घरविक्री 52 टक्केंनी वाढली आहे. तर, मुंबई आणि पुण्यात अनुक्रमे 86 आणि 83 टक्के विक्री वाझली आहे. राजधानी दिल्लीत देखील 34 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
संबंधित बातम्या:
एकदाच पैसे गुंतवा आणि पुढच्याच महिन्यापासून आयुष्यभर पेन्शन मिळवा; जाणून घ्या एलआयसीचा खास प्लान