पोट साफ होण्यासाठी संत प्रेमानंद महाराजांनी सांगितले रामबाण उपाय, बद्धकोष्ठतेपासून आराम अन् पचनशक्ती वाढणार
stomach clean naturally: बद्धकोष्ठता ही सर्वात त्रासदायक समस्या निर्माण होते. पोटाच्या समस्या टाळण्यासाठी योग्य आहार आणि दिनचर्या अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे.
How To Get Rid of Constipation Naturally: प्रत्येकाच्या शरीरात पोट साफ होणे गरजेचे आहे. जर पोट साफ झाला नसेल तर पोटदुखी, पोट फुगणे आणि गॅस बनण्याची समस्या आहे. त्यामुळे बद्धकोष्ठता ही सर्वात त्रासदायक समस्या निर्माण होते. पोटाच्या समस्या टाळण्यासाठी योग्य आहार आणि दिनचर्या अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे.
हे आहेत उपाय…
- संत प्रेमानंद महाराज यांनी पोट साफ आणि निरोगी ठेवण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले. पोट निरोगी असेल तरच शरीराचे इतर अवयवही सुरळीत चालतात आणि व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्यही चांगले राहते, असे त्यांचे मत आहे.
- संत प्रेमानंद महाराज यांच्या म्हणण्यानुसार, जेवण वेळेवर करणे अत्यंत आवश्यक आहे. दुपारचे जेवण सूर्यप्रकाशाच्या सर्वात तेजस्वी वेळी म्हणजे 12 वाजण्याच्या सुमारास घेतले पाहिजे. तसेच रात्रीचे जेवण सूर्यास्तानंतर लवकर आणि हलके असावे. यामुळे पचनसंस्थेवर फारसा भार पडत नाही आणि पोटही चांगले राहते.
- सकाळी कोमट पाणी पिणे पोटासाठी चांगले आहे. या पाण्यात थोडे मीठ आणि निंबू टाकल्यास त्याचा फायदा जास्त होतो. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ आणि घाण निघून जाते.
- भस्त्रिका, कपालभाती आणि अनुलोम-विलोम प्राणायाम केल्याने पोटातील नसा कार्यान्वित होऊन आंतरिक शुद्धीही होते. पोटाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या दूर करण्यासाठी या योगक्रिया उपयुक्त आहेत.
- जेवणात कोशिंबीर, ताजी फळे, हिरव्या भाज्या, अंकुरलेले धान्य इत्यादी पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. फायबर युक्त आहारामुळे पोटात कोणत्याही प्रकारचा ब्लॉकेज किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
- रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पोटातील ॲसिडीटीचे प्रमाण वाढू शकते. त्याऐवजी सकाळी कोमट पाण्यात मध किंवा लिंबू वापरता येईल. यामुळे पोट स्वच्छ तर राहतेच, पण शरीरात ताजेपणाही येतो.
- जर आपण रात्री उशिरा जेवण केले तर पचनक्रिया नीट होत नाही, त्यामुळे सकाळी पोट साफ होत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी लापशी, खिचडी किंवा सूप यासारखे हलके अन्न सेवन करणे चांगले.
- जेवणात आले, निंबू आणि काळे मीठचा वापर करावाल. त्यामुळे पाचन तंत्र चांगले राहते. तसेच पुरेशी वेळेवर झोप घेणेही गरजेचे आहे. सात ते आठ तास झोप घ्यावी, असे संत प्रेमानंद महाराज म्हणतात.