मुंबई, दि. 21 फेब्रुवारी 2024 | भारतीय रेल्वेमधून रोज लाखो लोक प्रवास करतात. रेल्वेचे आरक्षण करणे सोपे झाले आहे. परंतु आरक्षित (कन्फार्म तिकीट) तिकीट मिळणे अवघड झाले आहे. लांब पल्लांच्या ट्रेनमध्ये तीन, तीन महिन्यांपूर्वी तिकीट आरक्षित होते. तत्काल तिकीट काही मिनिटांमध्ये संपतात. यामुळे अनेक प्रवाशांना वेटींग तिकीट मिळते. अनेकदा वेटींग तिकीट कन्फार्म होत नाही. त्यानंतर ते तिकीट अॅटोमॅटीक रद्द होते आणि ते पैसे जमा होण्यासाठी आठवडाभरचा कालावधी लागतो. तत्काल तिकीट करताना ही सर्वात मोठी अडचण असते. परंतु आरआरसीटीसीने एक सुविधा दिली आहे. तिचा वापर केल्यावर तुमचे तिकीट कन्फार्म असेल तरच पैसे कापले जाणार आहे. अन्यथा तुमचे पैसे कापले जाणार नाही. तिकीट बुक करण्याचा या प्रक्रियाला Auto Pay नाव दिले आहे.
IRCTC ने iPay पेमेंट गेटवे मध्ये ही सुविधा दिली आहे. या पर्यायाचा वापर केल्यास तिकीट कन्फर्म असेल तरच पैसे कापले जाईल. iPay पेमेंट गेटवेचा ‘ऑटो पे’ फिचर युपीआय, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्डसोबत काम करतो. IRCTC iPay सर्वांसाठी फायदेशीर आहे. यामुळे वेटींग तिकीट काढून तुम्हाला रिफंडसाठी वाट पाहावी लागत नाही.