मुंबई : पैशांची गरज भासते तेव्हा कर्ज घेतलं जातं. कर्ज ही एक प्रकारची आर्थिक मदत असते. ठराविक वेळेत ती रक्कम परत केली जाणार, ही हमी घेऊन कर्जदार कर्ज देतो. वेळेत कर्जाची वसुली केली तर क्रेडिट स्कोअर वाढतो. एखाद्या व्यक्तीच्या कर्जाविषयीची नोंद क्रेडिट स्कोअरद्वारे ठरवली जाते. घेतलेलं कर्ज किती जबाबदारीने तुम्ही वसूल केलं हे क्रेडिट स्कोअरवरून कळतं. आता प्रश्न असा आहे की, गोल्ड लोन घेतल्यावर क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? तर उत्तर होकारार्थी आहे. नियोजित वेळेत गोल्ड लोनचे हफ्ते फेडले तर क्रेडिट स्कोअर वाढतो. तर या कर्जाचे हफ्ते थकल्यावर क्रेडिट स्कोअर झपाट्याने कमीदेखील होतो.
गोल्ड लोनसाठी अर्ज केल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो. पण हे घसरण्याचं प्रमाण खूपच कमी असतं. तुम्ही कर्जासाठी अर्ज करता तेव्हा, बँक किंवा एखादी पतसंस्था तुम्हाला पूर्वीच्या कर्जदाराकडून क्रेडिट रिपोर्ट आणायला सांगते. याला हार्ड इक्वायरी (Hard inquiry) असं म्हणतात. अशा प्रकारची चौकशी तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये नोंदवली जाते.
चौकशीशिवाय कोणतंही कर्ज मिळत नाही. अशा परिस्थितीत, म्हणजेच तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये अशा अनेक चौकशांची नोंद असेल, कमी काळात तुम्ही अनेक ठिकाणी कर्जाची विचारणा केली असेल तर तुम्हाला पैशांची नितांत गरज आहे, किंवा गरजेपेक्षा जास्त कर्ज घेत आहात, असे दिसून येते. हे दोन्ही संकेत चांगले नाहीत. यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअवर परिणाम होतो.
गोल्ड लोन घेतल्यानंतर, ठरलेल्या अटींनुसार, तुम्हाला पैसे परत करावे लागतात. कर्जाच्या अटींची पूर्तता कराल, तसा तुमचा क्रेडिट स्कोअर वाढत जातो. चांगला क्रेडिट स्कोअर तयार करण्यासाठी कर्जाचा EMI वेळेवर किंवा मुदतीपूर्वीच भरणे आवश्यक आहे. वेळेवर EMI भरला तर तुमचे क्रेडिट बिहेविअर चांगले असल्याचे दिसते, त्यानंतर भविष्यात अशा लोकांना बँका सहजपणे कर्ज देतात. एवढच नाही तर काही वित्तीय संस्था क्रेडिट स्कोअर पाहून व्याजदरात सवलतही देतात.
तर दुसरीकडे, कर्जाचे थकवले तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर त्याचा दुष्परिणाम होतो. एवढंच नाही तर तुम्हाला विलंब शुल्कही भरावे लागू शकते.
गोल्ड लोनचा क्रेडिट स्कोअरवर कसा परिणाम होतो, याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी IIFL (https://www.iifl.com/?utm_source=TV9&utm_medium=article&utm_campaign=IIFL_articles&utm_content=english&utm_term=Sept_22) या लिंकवर क्लिक करा.