मुंबई : देशातील सुवर्ण नियंत्रण कायदा (Gold Control Act) कधीचाच इतिहासजमा झाला आहे. पण घरात तुम्ही किती सोने ठेऊ शकता, याविषयी काही मर्यादा आहेत का. घरात जास्त सोने असल्याची कुणकुण लागल्यावर खरंच प्राप्तिकर खात्याची धाड पडते का. यापूर्वीचे निर्बंध हटवल्यानंतर आता काय निर्बंध आहेत. याविषयीची उत्सुकता आपल्या सर्वांनाच असते. केंद्रीय उत्पाद व सीमा शुल्क मंडळाने (Central Board of Direct Taxes) याविषयीचे परिपत्रक जाहीर केले आहे. त्यात या शंकाची उत्तरे दिली आहेत. या परिपत्रकात, घरात किती सोने असावे याविषयीच्या नियमांची माहिती दिली आहे. त्यानुसार, एका विवाहित महिलेला 500 ग्रॅम सोन्याची आभुषणे, दागिने ठेवता येतील. तर अविवाहित महिलेला 250 ग्रॅम सोन्याची दागिने जवळ बाळगता येतील. परंतू पुरुष याबाबतीत तेवढे लकी नाहीत. पुरुष विवाहित असो वा मुंजा, त्याला 100 ग्रॅमपेक्षा जास्तीचे सोने बाळगता येत नाही. जर प्राप्तीकर खात्याची (Income Tax Department) धाड पडली तर याहून जास्त्तीचे सोने जप्त होईल. परंतू, 100 ग्रॅमपर्यंतचे सोने जप्त होणार नाहीत.
कर आणि गुंतवणूक सल्लागार बलवंत जैन यांनी सांगितले की, केंद्रीय उत्पाद व सीमा शुल्क मंडळाच्या परिपत्रकाने सोने बाळगण्याविषयीची एक स्पष्ट सीमा मर्यादा घालून दिली आहे. त्यामुळे प्राप्तिकर अधिकारी ज्यावेळी धाड टाकतील, तेव्हा त्यांना या मर्यादेच्या आतील दागिने जप्त करता येणार नाही. विशेष म्हणजे या मर्यादेच्या आत तुमच्याकडे सोने असेल आणि त्याविषयीच्या खरेदी पावत्या अथवा इतर महत्वाचे पुरावे तुमच्याकडून गहाळ झाले असतील तरी चिंतेचे कारण नाही. कारण ही मर्यादा आता अधोरेखित झाल्याने मर्यादेच्या आतील सोन्याला हात लावता येणार नाही.
एवढेच नाही तर ,सीबीडीटीच्या परिपत्रकात तुम्ही मर्यादेपेक्षा जास्तीचे सोने ठेऊच शकत नाही असे ही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत.हा नियम करदात्यांच्या सुविधेसाठी लागू करण्यात आला आहे. जर तुमच्या घरावर छापा पडलाच आणि तुमच्याकडे मर्यादेपेक्षा अधिकचे सोने आढळले तर हे अधिकचे सोने अधिका-यांना नेता येईल. मर्यादेच्या आतील सोने अधिका-यांना जप्त करता येणार नाही.
सोन्याची दागिने स्वतः खरेदी केली असतील वा घरातील ज्येष्ठांकडून भेट म्हणून मिळाले असेल, ते घरात ठेवा अथवा बँकेच्या लॉकरमध्ये त्याविषयीच्या अधिकृत पावत्या, भेट दिल्याचे पुरावे सांभाळून ठेवा. त्यामुळे अचानक धाड पडल्यास अथवा एखाद्या चौकशीदरम्यान अचानक तपासणी झाल्यास या कागदपत्रांमुळे तुमची ही संपत्ती जप्त होणार नाही.
संबंधित बातम्या :
कोरोनाचा प्रभाव वसरला; सोन्याची विक्रमी आयात, 2021 मध्ये 27 टक्क्यांची वाढ