मुंबई : 31 मार्च जवळ आली की सरकारी कार्यालयात जणू उत्सवापूर्वीच्या तयारीची गडबड असते. ऊर फाटेस्तोवर कामाची कोण लगबग असते, सर्वच सरकारी कार्यालयात लगीनघाई असते. तर ग्राहक आणि नागरिकांची धांदल उडालेली असते. कोणत्या तरी योजना, सवलतीची मुदत संपत येणार असते आणि मुदत असताना झोपलेले लोक अचानक जागे होत काम करण्यासाठी तुटून पडतात. आर्थिक वर्षाची (Fiscal Year) शेवटची तारीख असल्याने या कामांचा निपटारा करणे अत्यावश्यक असते, कारण त्यासाठी मुदत दिलेली असते. सध्या पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक (Pan Card-Aadhar Card Link) करण्यापासून ते डिमॅट खात्यात (Demat Account) वारस जोडण्यापर्यंतच्या अनेक कामांची अंतिम मुदत संपत आली आहे. ईपीएफओ मध्ये ई-नॉमिनेशनची (EPFO e-Nomination) अंतिम तारीख 31 मार्च आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात या कामांचा निपटारा करणे अत्यावश्यक आहे. नाहीतर तुम्ही मिळणा-या खास सवलतींना मुकाल. आता डिमॅट खाते धारकांना दिलासा देणारी बातमी, त्यांना खात्यात वारस जोडण्याच्या प्रक्रियेला एक वर्षांची मुदत वाढ देण्यात आली आहे.
शेअर बाजारातील उलाढालीत सक्रिय असणा-या डिमॅट खातेधारकांनी त्यांच्या वारसदाराचे नाव खात्याशी जोडावे यासाठी भारतीय प्रतिभूती आणि विनियमन बोर्डाने अर्थात सेबीने 31 मार्च ही अंतिम तारीख जाहीर केली होती. या कालावधीतच खातेधारकांना ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण करायची होती. परंतू सेबीने खातेधारकांना ऐन दोन दिवसांपूर्वी मोठा दिलासा दिला आहे. खातेधारकांना नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक वर्षांचा कालावधी दिला आहे. याचा अर्थ जे ग्राहक नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण करु शकले नाहीत. त्यांना 31 मार्च 2023 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. यापूर्वी ही तारीख 31 मार्च 2022 होती.
इतर बातम्या
भाजपमध्ये विखेंना मान मिळतो की नाही याबाबत मला माहीत नाही – Chhagan Bhujbal
Nashik | सासूचा अंत्यसंस्कार करून आलेल्या नवविवाहितेला विजेचा शॉक; अर्ध्यावरती डाव मोडिला…!