नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच राष्ट्रीय डिजिटल स्वास्थ्य मिशनचा (एनडीएचएम) उद्घाटन करण्यात आले होते. राष्ट्रीय हेल्थ डिजिटल मिशन (NHDM) अंतर्गत, प्रत्येक नागरिकासाठी एक आरोग्य ओळखपत्र तयार केले जाईल. जे त्यांचे आरोग्य खाते म्हणून देखील काम करेल. ज्यामध्ये वैयक्तिक आरोग्य नोंदी जोडल्या जाऊ शकतात आणि मोबाईल अॅप्लिकेशनच्या मदतीने पाहिल्या जाऊ शकतात.
या योजनेअंतर्गत देशातील 10 कोटीहून अधिक कुटुंबांना लाभ मिळेल. यासाठी तुम्हाला आयुष्मान भारतचे कार्ड बनवावे लागेल, त्यासाठी काही आवश्यक पात्रता निर्धारित करण्यात आली आहे. पात्र लोक हे कार्ड बनवू शकतात आणि हॉस्पिटलमध्ये 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळवू शकतात.
* सर्वप्रथम पीएम जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाइट mera.pmjay.gov.in वर लॉग इन करा.
* तुम्हाला डाव्या हाताला LOGIN लिहिलेले दिसेल जिथे मोबाईल नंबरची माहिती विचारली जाईल. एंटर मोबाईल नंबरसह कॉलममध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका. त्या खाली तुम्हाला कॅप्चा कोड भरण्यास सांगितले आहे, तोच टाका. यानंतर तुम्हाला मोबाईलवर OTP मिळेल .
* यानंतर तुम्हाला तुमच्या प्रांत आणि जिल्ह्यावर क्लिक करावे लागेल.
* हे केल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे किंवा आयडी क्रमांक निवडण्यास सांगितले जाते. यावर क्लिक केल्यानंतर सर्च वर क्लिक करा
जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला पीएम आरोग्य योजना (PMAY) द्वारे आयुष्मान कार्ड जारी केले जाईल. या कार्डद्वारे, तुमच्या कुटुंबाला एका वर्षात कोणत्याही सूचीबद्ध रुग्णालयात 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतील. यासाठी सरकारने देशभरातील निवडक रुग्णालये सूचीबद्ध केली आहेत. ज्याची माहिती पीएम जनआरोग्य योजनेच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
हेल्थ आयडी तयार करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग, घराचा पत्ता इत्यादी तपशील भरावे लागतील. तुम्ही आधार, जन्मतारीख, मोबाईल नंबर किंवा आधार नंबर यांच्या साहाय्याने युनिक हेल्थ आयडी निर्माण करु शकता.
तुमचा हेल्थ आयडी हा युनिक असेल. त्यामुळे तुम्ही आरोग्याशी संबंधित सर्व तपशील या हेल्थ आयडीशी जोडू शकता. हेल्थ आयडीच्या नोंदणी प्रक्रियेसाठी फक्त 10 मिनिटांचा अवधी लागतो. वैयक्तिक तपशील भरल्यानंतर मोबाईल क्रमांक किंवा आधारकार्डाच्या माध्यमातून तुमची पडताळणी केली जाईल.
संबंधित बातम्या:
आधारकार्डाप्रमाणे तयार होणार तुमचे डिजिटल हेल्थ कार्ड, कशाप्रकारे करणार काम, जाणून घ्या सर्वकाही