ना रांग लावण्याची गरज, ना टाईप करण्याची झंझट… बोला किंवा कॉल करा अन् रेल्वे तिकीट बुक, आवाजाने पेमेंट

| Updated on: Sep 01, 2024 | 2:09 PM

IRCTC Ticket Booking: पेमेंट प्रक्रिया सुरक्षित करण्यासाठी युजरला त्याचा मोबाइल नंबर किंवा UPI आयडी वेळेच्या आत अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. पैसे भरल्यानंतर तिकीट बुक केले जाते. IRCTC ॲप आणि वेबसाइटवर चॅटबॉट वापरू शकता.

ना रांग लावण्याची गरज, ना टाईप करण्याची झंझट... बोला किंवा कॉल करा अन् रेल्वे तिकीट बुक, आवाजाने पेमेंट
indian railway
Follow us on

IRCTC Ticket Booking: भारतीय रेल्वेने रोज लाखो जण प्रवास करतात. लोकांचा प्रवास अधिक चांगला बनवण्यासाठी रेल्वेकडून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आता रेल्वे तिकीट बुकींग करण्यासाठी नवीन सुविधा रेल्वेने सुरु केली आहे. या सुविधेमुळे तुम्हाला तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही किंवा टाईप करण्याचाही प्रसंग येणार आहे. तुमच्या आवाजाने किंवा फोन कॉलने तिकीट बुक होईल. त्यानंतर पेमेंटसुद्धा आवाजाने युपीआयच्या माध्यमातून होईल. रेल्वेने ही सुविधा व्हर्चुअल असिस्टेंट AskDISHA च्या माध्यमातून सुरु केली आहे.

अशी वापरा ही सुविधा

रेल्वेचे तिकीट बुकींग करणे आता सोपे झाले आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिज्म कॉर्पोरेशनच्या (IRCTC) वेबसाईट अन् अ‍ॅपवरुन कॉल करुन किंवा बोलून तिकीट बुक होणार आहे. यासाठी IRCTC, NPCI आणि CoRover ने युपीआयसाठी “कन्वर्सेशनल व्हॉयस पेमेंट्स सर्व्हीस” लॉन्च केली आहे. ही सुविधा पेमेंट गेटवेसोबत कनेक्ट केली आहे. त्यामुळे तुम्ही आवाजाने किंवा कॉल करुन युपीआय आयडी अन् मोबाईल क्रमांक टाईप करुन तिकीट बुकींग अन् पेमेंट करु शकतात. या सुविधेत फक्त तिकीट बुकींग होणार नाही तर तिकीट रद्द करणे, पीएनआर स्टेट्स ही माहितीसुद्धा मिळणार आहे.

कशी काम करणार प्रणाली

रेल्वेची ही सेवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (AI)आधारित आहे. रेल्वेचा AI व्हर्च्युअल असिस्टंट AskDisha द्वारे ही सेवा मिळणार आहे. त्याच्या मदतीने तुम्ही बोलून तुमचे तिकीट बुक आणि रद्द करू शकता. जेव्हा तुम्ही मोबाइल नंबर देणार तेव्हा कन्वर्सेशनल व्हॉयस पेमेंट सिस्टम त्याला असणारा UPI ID मिळवेल. त्यानंतर तिकिट पेमेंट रिक्वेस्ट युजर्सच्या व्हॉइस कमांडवर डीफॉल्ट UPI ॲपद्वारे सुरू केली जाईल.

हे सुद्धा वाचा

वेळेची मर्यादा असणार

पेमेंट प्रक्रिया सुरक्षित करण्यासाठी युजरला त्याचा मोबाइल नंबर किंवा UPI आयडी वेळेच्या आत अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. पैसे भरल्यानंतर तिकीट बुक केले जाते. IRCTC ॲप आणि वेबसाइटवर चॅटबॉट वापरू शकता. त्यासाठी युपीआय , भारतपे अन् लॅस कन्वर्सेशनल व्हॉयस पेमेंट , IRCTC आणि भारतीय रेल्वेच्या AI व्हर्चुअल असिस्टेंट AskDISHA ला इंटीग्रेट केले आहे. ही सर्व प्रक्रिया सोपी अन् वेगवान होणारी आहे.