Jandhan Account: फक्त एक मिस कॉल द्या आणि जाणून घ्या तुमच्या अकाऊंटमधील बॅलन्स

| Updated on: Aug 14, 2021 | 6:59 AM

Jandhan Bank Account | 18004253800 किंवा 1800112211 या क्रमांकावर मिस कॉल देऊन तुम्ही जनधन खात्याचा बॅलन्स जाणून घेऊ शकता. मात्र, त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर्ड असला पाहिजे.

Jandhan Account: फक्त एक मिस कॉल द्या आणि जाणून घ्या तुमच्या अकाऊंटमधील बॅलन्स
जनधन बँक खाते
Follow us on

नवी दिल्ली: एखाद्या बँकेत तुमचे जनधन खाते असेल तर तुम्ही घरबसल्या केवळ एक मिस कॉल देऊन तुमच्या अकाऊंटमधील बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमचे बँक खाते आधार कार्डाशी जोडणे गरजेचे आहे. पंतप्रधान जनधन योजनेतंर्गत ग्राहकांना अनेक सुविधा दिल्या जातात. हे झिरो बॅलन्स खाते असते. याशिवाय, तुम्हाला ओव्हरड्राफ्ट आणि रुपे कार्डाची सुविधाही मिळते.

तुम्ही https://pfms.nic.in/NewDefaultHome.aspx# या पोर्टलवर जाऊनही जनधन खात्यातील रक्कम तपासू शकता. याठिकाणी तुम्हाला Know your Payment हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तुमचा अकाऊंट नंबर आणि कॅप्चा कोड भरून तुम्हील बॅलन्स जाणून घेऊ शकता.

याशिवाय, 18004253800 किंवा 1800112211 या क्रमांकावर मिस कॉल देऊन तुम्ही जनधन खात्याचा बॅलन्स जाणून घेऊ शकता. मात्र, त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर्ड असला पाहिजे.

तब्बल 6 कोटी जनधन अकाऊंट निष्क्रिय, तुमचं खातंही चेक करा

तप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी प्रधानमंत्री जनधन योजनेनुसार (Pradhan Mantri Jan Dhan Yojana PMJDY) देशातील नागरिकांची बँकांमध्ये जन धन खाती (Jan Dhan Account) उघडण्यात आली. बँक सुविधापासून वंचित असलेल्यांना प्राधान्याने ही खाती उघडून देण्यात आली. मात्र आता याबाबत नवी माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार जन धन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यांपैकी तब्बल 5.82 कोटी खाती निष्क्रिय आहेत. महत्त्वाचं म्हणजे यापैकी 2.02 कोटी खाती ही महिलांची आहेत. या खात्यांमध्ये कोणतेही व्यवहार न झाल्याने निष्क्रिय खात्यांची संख्या मोठी आहे.

देशाचे नवे अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. निष्क्रिय खात्यांची संख्या 5.82 कोटी इतकी आहे. निष्क्रिय खात्यांच्या संख्येची टक्केवारी मार्च 2020 मध्ये 18.08 होती, तर जुलै 2021 मध्ये त्यामध्ये घट होऊन ती टक्केवारी 14.02 टक्क्यांवर पोहोचली.

खाते निष्क्रिय कधी होते?

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, जर एखाद्या खात्यात सलग दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक दिवस कोणताही जमा-खर्चाचा व्यवहार झाला नाही तर ते खाते इनऑपरेटिव्ह अर्थात निष्क्रिय होतं. म्हणजे 5.82 कोटी जन धन खाती अशी आहेत, ज्यामध्ये दोन वर्षांपासून कोणतेच व्यवहार झालेले नाहीत. हा चिंतेचा विषय यासाठी आहे की ज्या गरिबांच्या कल्याणासाठी अशी खाती उघडण्यात आली, त्यांच्या खात्यात सरकारकडून विविध योजनांचे पैसे, ग्रामीण रोजगार हमीचे पैसे पाठवले जातात.

जुनं सेव्हिंग खातं जनधन खात्यात बदला

तुमचं जुनं सेव्हिंग खातं असेल तर ते जनधन खात्यात रुपांतरित करता येतं. त्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन एक फॉर्म भरावा लागेल. तसंच आपल्या खात्याच्या RuPay कार्डसाठी अर्ज करावा लागेल. वैध अर्ज भरुन तुमचं खातं जनधन खात्यात बदललं जाऊ शकतं.

आधार कार्डद्वारे निष्क्रिय खाते सक्रिय करा

तुम्ही आधार कार्डद्वारे जनधन अकाऊंट सुरु करु शकता. जर या खात्यात कोणताही व्यवहार झाला नाही तर ते बंद होऊ शकतं. मात्र पुन्हा ते सुरु करण्यासाठी तुम्हाला या खात्यात व्यवहार सुरु ठेवावा लागेल.

संबंधित बातम्या 

कधी काळी खिशात 25 पैसे नव्हते, आज 500 कोटींचे मालक, कोण आहेत सांगलीचे अशोक खाडे?

ग्रामपंचायत किंवा सरपंचाच्या स्वाक्षरीमधील दस्तावेजातील पत्ता आधारनुसार बदलता येतो का? जाणून घ्या