नवी दिल्ली | दि. 8 मार्च 2024 : देशातील भारतात पाणी विकत घ्यावे लागणार? काही वर्षांपूर्वी याचा विचार कोणी केला नव्हता. परंतु आता काळानुसार बदल झाला आहे. प्रवास असो की कोणताही कार्यक्रम बॉटल बंद पाणी घेणे ही काळाची गरज झाली आहे. यामुळे बाजारात विविध कंपन्यांचे पाणी आले आहे. बिसलेरी (Bisleri), किनली (Kinley) या कंपन्यांचे मार्केट मोठे आहे. पण नोंदणीकृत नसलेल्या कंपन्याही पाणी विकत आहेत. काही वेळा पाणी घेताना फसवणूक होऊ शकते. पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या (Packaged Drinking Water) नावावर फसवणूक होते. जुन्या बाटलीत साधे पाणी भरून विकले जाते. मग पाणी शुद्ध आहे? हे कसे ओळखावे.
20 रुपयांची पाणी बॉटल घेताना ते शुद्ध आणि मिनरलयुक्त असण्याची ओळख करुन घ्या. पाण्याच्या चवीवरुन ते ओळखता येत नाही. जेव्हा तुम्ही पाण्याची बॉटल घेतात तेव्हा ISI मार्कवर एक कोड असतो. IS-14543 हा कोड पाहिल्यावर बॉटल असली की नाही, हे स्पष्ट होते.
पॅकींग असलेल्या बॉटलवर कोड कॉपी केले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही कसे ओळखाल? त्यावर एक उपाय आहे. गुगल प्ले स्टोरवरुन BIS Care नावाचे अॅप डाऊनलोड करुन घ्या. अॅप इंस्टाल झाल्यावर तुम्हाला त्या बॉटलवरील कोडसंदर्भात सर्व माहिती मिळेल. तसेच हे पॅक कुठे झाले? त्याची माहिती मिळेल. अॅपमध्ये ISI लिहिलेले असणार आहे. त्यावर व्हेरिफाय लायस्नस डिटेल… या ऑप्शनवर क्लिक करा. त्यावेळी CM/L- 10 डिजिट कोड मागितला जाईल. हा कोड बॉटलवर पॅकेजिंगवरुन कॉपी करुन टाकावा लागणार आहे.
कोड पाणी बॉटल पॅकेजिंगवर ISI मार्कच्या खाली असतो. तुम्हा 10 अंक असणारा कोड टाकल्यावर गो ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर सर्वच माहिती येईल. म्हणजेच हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे की नाही? पाण्यात मिनरल्स आहे की नाही? यामुळे पाण्यापासून होणाऱ्या अनेक गंभीर आजारापासून सुटका मिळू शकते.