नवी दिल्ली : डेबिट कार्डने आर्थिक व्यवहारात क्रांती आणली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. डेबिट कार्डमुळे आर्थिक देवाण, घेवाण सोपी झाली, तसेच जवळ पैसे बाळगण्याची देखील आवश्यकता राहिली नाही. डेबिट कार्डमुळे कुठल्याही जवळच्या एटीएममधून आपल्याला क्षणात पैसे मिळू शकतात. मात्र डेबिट कार्डचा वापर करताना काळजी घ्यावी लागते. डेबिटच्या माध्यमातून आतापर्यंत अनेकांना गंडा घातला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेकांची मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे. फसवणूक टाळून डेबिटच्या माध्यमातून कसा अधिकाधिक सुरक्षीत व्यवहार करता येईल हेच आपण आज जाणून घेणार आहोत.
जेव्हा तुम्ही पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जाता, तेव्हा ते मशिन आधी व्यवस्थित तपासून घ्या, एटीएम पीन टाकताना तुमच्या जवळपास कोणी नाहीना? याची खात्री करा. तसेच पीन टाकताना एटीएम मशीन व्यवस्थित कव्हर करा. जर तुम्ही पहिल्यांदाच डेबिट कार्डचा वापर करत असाल आणि तुम्हाला ते वापरण्यासाठी काही अडचणी निर्माण झाल्यास इतरांची मदत घेऊ नका. कारण त्यातून अनेकवेळा तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते. तुम्ही जेव्हा एटीएममधून पैसे काढता, तेव्हा प्रत्येकवेळी तुम्हाला पैसे कपातीचा एक एसएमएस किंवा मेल येतो, तो चेक करून आपण जेवढे पैसे काढले आहेत, तेवढेच खात्यामधून कमी झाले आहेत का? याची खात्री करून घ्या. तुम्ही डेबिट कार्डच्या मदतीने कुठलाही व्यवहार केला नाही, मात्र तरी देखील तुमचे पैसे कमी झाल्यास तातडीने बँकेशी संपर्क साधा.
बऱ्याचवेळ डिजिटल फसवणूक ही छोट्या-छोट्या अमाऊंटमधून होत असते. त्यामुळे जर तुम्हाला तुमचे पैसे अशापद्धतीने खात्यामधून कपात झालेले आढळल्यास किंवा तुम्ही अकाऊंट चेक करताना पैसे कमी आढळल्यास तातडीने बँकेशी संपर्क साधा. एटीएममधून पैस काढल्यानंतर शिल्लक राहिलेल्या पैशांचा येणारा एसएमएस तपासून घ्या.
जर समाजा तुमच्या खात्यामधून पैस कट झाले किंवा तुमची कोणी ऑनलाईन फसवणूक केली तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा. तुमचे डेबिट कार्ड ब्लॉक करा. अशा परिस्थिमध्ये तुम्ही थेट सायबर सेलकडे देखील तक्रार करू शकता. तुमच्या खात्यामधून किती रक्कम कपात झाली याची माहिती तुमच्या बँकेला द्या. आरबीआयच्या नियमानुसार जर तुमची कोणतीही चूक नाही आणि तरी देखील तुमच्या खात्यामधून पैशांची कपात झाली तर बँकेला तुमच्या खात्यामधून जेवढी रक्कम कपात झाली आहे, ती पूर्ण देणे बंधनकारक असते.
अर्थ नियोजन वाचवेल तुमचा गृहकर्जाचा ताण, या 4 गोष्टींची काळजी घेतल्यास कर्जाच्या घरातही सुखाची झोप
लग्नानंतर पीएफ खात्यात वारसाचे नाव कसे करावे अपडेट; जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया आणि नियम