नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) मार्फत विविध सेवा उपलब्ध आहेत. सध्या ऑनलाईन सेवा उपलब्ध करण्याकडे EPFO नं लक्ष केंद्रित केलं आहे. सरकारी तसेच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही कामासाठी रांगांमध्ये प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. घरबसल्या एका क्लिकवर ऑनलाईन सेवांची उपलब्धता झाली आहे. EPFO (Employees’ Provident Fund Organization) सदस्य आपले अकाउंट ऑनलाईन ट्रान्सफर करू शकतात. साध्या व सुलभ पद्धतीने EPFO नं पायरीनुसार प्रक्रिया विशद केली आहे. (How to transfer pf account know step by step process)
ईपीएफओने (EPFO) ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे. केवळ सहा पायऱ्यांसह पीएफ अकाउंटला घरबसल्या ट्रान्सफर केले जाऊ शकते. खासगी क्षेत्रात नोकरी बदल्यानंतर पीएफ अकाउंट ट्रान्सफर करणे आवश्यक ठरते. यामुळेच कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट अखंडित सुरू राहते आणि त्यात पीएफची रक्कम जमा होते.
1. तुम्हाला सर्वप्रथम ईपीएफओ पोर्टलवरुन unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ लॉग-इन करावे लागेल. यासाठी UAN आणि पासवर्ड आवश्यक असेल.
2. लॉग-इन नंतर तुम्हाला ‘ऑनलाइन सर्व्हिस’ वर जावे लागेल. त्यानंतर ‘वन मेंबर वन अकाउंट (ट्रान्सफर विनंती)’ वर क्लिक करावे लागेल.
3. तुमच्या वैयक्तिक माहितीची पडताळणी करावी लागेल. संबंधित पीएफ अकाउंटची पडताळणी त्यानंतर करणे अनिवार्य असेल.
4. तुम्हाला गेट तपशीलावर क्लिक करावे लागेल. त्यावेळी मागील कंपनीचे पीएफ अकाउंट तपशील दिसतील.
5.फॉर्मला छायांकित करण्यासाठी ‘मागील कंपनी’ किंवा ‘वर्तमान कंपनी’ यापैकी एकाची निवड करावी लागेल.
6.तुमच्या UAN रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओटीपी मिळविण्यासाठी विनंती करावी लागेल आणि प्राप्त ओटीपी एन्टर करावा लागेल.
वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर निवडलेल्या कंपनीची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर नव्या कंपनीत पीएफ ट्रान्सफर केला जाईल. त्यासोबत जुन्या अकाउंट मधील पीएफ नव्या अकाउंटमध्ये वर्ग होईल.
Check out the Steps on How to transfer EPF digitally. #EPFO #EPF #SocialSecurity #Employees https://t.co/Gu8S4uek38@PMOIndia @byadavbjp @Rameswar_Teli
@LabourMinistry @MIB_India @PIB_India @PIBHindi
@mygovindia @PTI_News— EPFO (@socialepfo) December 24, 2021
लहान मुलांसाठी आधार कार्ड का आहे महत्त्वाचे?, कितव्या वर्षी होते अपडेट जाणून घ्या
PF Withdrawal: पीएफ कधी काढता येतो?; जाणून घ्या पीएफबाबतच्या महत्त्वाच्या अटी
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छिता; तर लक्षात ठेवा ‘या’ चार गोष्टी
(How to transfer pf account know step by step process)