नवी दिल्ली : पोस्ट ऑफिसने पती-पत्नीसाठी एक विमा पॉलिसी आणली आहे. यामध्ये पती आणि पत्नी दोघांचाही एकत्र विमा काढला जातो. पोस्ट ऑफिस एक जॉइंट लाइफ एन्डोमेंट इन्शुरन्स प्लान देते. त्याचे नाव युगल सुरक्षा आहे. यामध्ये नवरा-बायको दोघांनाही एका प्रीमियमसह लाईफ कव्हर मिळते. यामध्ये किमान विमा रक्कम 20,000 रुपये आणि जास्तीत जास्त 50 लाख रुपये आहे. केवळ 45 वर्षांपर्यंतची व्यक्ती या विम्याचा लाभ घेऊ शकतात. यापेक्षा अधिक वयाचे लोक ही पॉलिसी विकत घेऊ शकत नाहीत. या योजनेसाठी किमान वयोमर्यादा 21 वर्षे ठेवण्यात आली आहे. (Husband and wife insurance at the same premium, start the policy with only Rs 4,000, maturity will get Rs 20 lakh)
युगल सुरक्षा पॉलिसीमध्ये मॅच्युरिटीसह बोनस देखील उपलब्ध आहे. ही पॉलिसी केंद्र सरकारकडून पूर्णपणे संरक्षित आहे, म्हणून जीवनासोबतच पैसेही सुरक्षित समजले जातात. ही पॉलिसी प्रत्येकासाठी नाही, परंतु बहुतेक लोक ती विकत घेऊ शकतात. जे केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा निमशासकीय संस्थेत काम करतात ते ही पॉलिसी घेऊ शकतात. डॉक्टर, अभियंते, व्यवस्थापन सल्लागार, सीए, वकील आणि बँकांमध्ये काम करणारे लोक ही पॉलिसी घेऊ शकतात. याशिवाय मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत काम करणारे लोकही ही पॉलिसी घेऊ शकतात.
युगल सुरक्षा पॉलिसी किमान 5 वर्षासाठी घ्यावी लागेल. या पॉलिसीची कमाल मुदत 20 वर्षे असते. म्हणजेच आपण ही पॉलिसी कमीत कमी 5 वर्षे आणि जास्तीत जास्त 20 वर्षांसाठी खरेदी करू शकता. पॉलिसी जेवढ्या वर्षांसाठी असेल तेवढी वर्षे प्रीमियम भरावा लागतो. ही पॉलिसी 20,000 ते 50,00,000 रुपयांमध्ये घेता येईल. प्रीमियम दर महिन्याला, दर तीन महिन्यांनी, अर्धवार्षिक किंवा ग्राहकाला हवा असल्यास वार्षिक दिला जाऊ शकतो. त्यासाठी पॉलिसी घेताना प्रीमियम कसा भरायचा हे ठरवावे लागते.
समजा एखाद्या व्यक्तीचे वय 32 वर्षे व पत्नीचे वय 30 वर्षे आहे आणि त्यांनी युगल सुरक्षा पॉलिसी घेतली. यासाठी त्या व्यक्तीने 10 लाख रुपयांच्या सम अॅश्युअर्डची पॉलिसी घेतली आहे आणि पॉलिसीची मुदत 20 वर्षे ठेवली आहे. तर त्यांना 20 वर्षांसाठी पॉलिसीचा प्रीमियम भरावा लागेल. जर त्या व्यक्तीने मासिक प्रीमियमची निवड केली तर प्रथम वर्षाला त्याला 4,392 रुपये आणि दुसर्या वर्षी 4,297 रुपये भरावे लागतील. जर वार्षिक प्रीमियम भरायचा असेल तर त्याला पहिल्या वर्षी 52,706 रुपये आणि दुसर्या वर्षी 51,571 रुपये द्यावे लागतील. पहिल्या वर्षाचा प्रीमियम जीएसटीमुळे थोडा जास्त येतो. संपूर्ण पॉलिसी टर्म दरम्यान, त्यांना प्रीमियम म्हणून एकूण 10,32,558 रुपये जमा करावे लागतील.
20 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, ही पॉलिसी मॅच्युअर होईल आणि त्या व्यक्तीला मॅच्युरिटीचे पैसे मिळतील. त्याअंतर्गत त्या व्यक्तीला 10 लाख सम अॅश्युअर्ड, 10.40 लाख रुपयांचा बोनस म्हणजेच 20,40,000 रुपये मिळतील. या पॉलिसीमध्ये डेथ बेनिफिट देखील आहे. जर पॉलिसी घेतल्यानंतर 2 वर्षानंतर, 5 वर्षानंतर किंवा 15 वर्षांनंतर पॉलिसी धारक व्यक्ती किंवा त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला तर दुसऱ्या जोडीदारास डेथ बेनेफिटचा लाभ मिळेल. यामध्ये विमाराशी आणि बोनसचा लाभ उपलब्ध आहे. पॉलिसी जितकी जास्त काळ चालेल तितका बोनस जास्त असेल.
पॉलिसी दरम्यान नवरा-बायको दोघांचा मृत्यू झाल्यास, विमा राशी नामनिर्देशित व्यक्तीला दिली जाते. ही पॉलिसी घेतल्यानंतर 3 वर्षानंतर आपण सरेंडर देखील करू शकता. या पॉलिसीवर कर्जाची सुविधा देखील उपलब्ध आहे. 3 वर्ष प्रीमियम भरल्यानंतर कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. जर कोणत्याही कारणास्तव पॉलिसी मध्येच बंद केली असेल तर ती रिवाइवलही करता येते. प्रीमियम 6 महिन्यांसाठी भरला नाही तर पॉलिसी लॅप्स होते आणि पुन्हा चालू करावी लागेल. (Husband and wife insurance at the same premium, start the policy with only Rs 4,000, maturity will get Rs 20 lakh)
शिवसेनेच्या विधानसभा संघटकाची ईडी चौकशी, सेनेचे मुंबईतील बडे नेते ईडीच्या रडारवर येणार?https://t.co/ROHt7tiYG7#MumbaiCrime #Crime #ShivSena #ED
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 17, 2021
इतर बातम्या
‘मोदी हटाव देश बचाव’, कराडमधील सायकल रॅलीतून पृथ्वीराज चव्हाणांचा नारा