मुंबई: मालमत्ता आणि बाजार भांडवलाच्या बाबतीत देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील ICICI बँकेने शनिवारी चालू आर्थिक वर्षाच्या (2021-22) दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा 30 टक्क्यांनी वाढून 5511 कोटी रुपये झाला. या कालावधीत, बँकेची प्रोव्हिजनिंग 9 टक्क्यांनी घटून 2714 कोटी रुपये झाल्याचे निदर्शनास आले.
या कालावधीत बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (NII) 25 टक्क्यांनी वाढून 11,690 कोटी रुपये झाले आहे. वर्षभरापूर्वी 2021 च्या सप्टेंबर तिमाहीत ते 9366 कोटी रुपये होते. कर्जावर आकारले जाणारे व्याज दर आणि ठेवीवरील व्याज यांच्यातील फरकाला निव्वळ व्याज उत्पन्न म्हणतात.
आयसीआयसीआय बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन वाढून 4 टक्के झाले आहे. जून 2021 च्या तिमाहीत तो 3.89 टक्के होता. तर गेल्यावर्षी याच तिमाहीत ते 3.57 टक्के होते. वर्षभराच्या आधारावर सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत बँकेचा कोर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 23 टक्क्यांनी वाढून 9518 कोटी रुपये झाला. तिमाही आधारावर, सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत बँकेचा एकूण NPA 4.82 टक्के होता. जून २०२१ च्या तिमाहीत ते ५.१५ टक्के होते, जे एका वर्षापूर्वी ५.१७ टक्के होते.
गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी ठेवल्याने अनेक बँकांनी आता ग्राहकांना त्याचा फायदा द्यायला सुरुवात केली आहे. गृहकर्ज घेतलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना याचा फायदा मिळेल. आयसीआयसीआय बँकेने गृहकर्जाचा व्याजदर कमी केला होता. 1 सप्टेंबरपासून नवे व्याजदर लागू झाले होते.
ICICI बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गृहकर्जावर 7.25 टक्के इतका I-MCLR1Y लागू करण्यात आला होता. सप्टेंबरपूर्वी MCLR च्या बेसिस पॉईंटनुसार ICICI बँकेचा गृहकर्जाचा व्याजदर 7.7 टक्के इतका होता. 1 सप्टेंबरपासून तो 7.55 टक्के इतका असेल. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून आयसीआयसीआय बँकेतून गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांचा प्री- ईएमआयचा हप्ता किंचित का होईना पण कमी झाला होता.
संबंधित बातम्या:
आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, एटीएममध्ये जाण्याआधी जाणून घ्या नवा नियम
Education loan : आयसीआयसीआय बँक देतेय 1 कोटीपर्यंतचे तत्काळ शैक्षणिक कर्ज, जाणून घ्या डिटेल्स
ICICI Bank कडून ग्राहकांना अलर्ट, लवकर अपडेट करा मोबाईल अॅप नाहीतर…