Income Tax : असा मिळेल आधार! ITR चा झटपट पडताळा होणार, ही आहे प्रक्रिया

| Updated on: Jul 25, 2023 | 6:42 PM

Income Tax : इनकम टॅक्स रिटर्नच्या ई-व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्डची मदत होऊ शकते. झटपट पडताळा होण्यासाठी अशी प्रक्रिया करता येईल. ती उपयोगी पडेल.

Income Tax : असा मिळेल आधार! ITR चा झटपट पडताळा होणार, ही आहे प्रक्रिया
Follow us on

नवी दिल्ली | 25 जुलै 2023 : इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरल्यानंतर 120 दिवसांच्या आत त्याचा पडताळा करणे गरजेचे आहे. आयटीआर व्हेरिफिकेशन केले नाही तर ते अवैध मानण्यात येते. आधार कार्डधारक आपल्या आधार क्रमांकाचा उपयोग करुन आयकर रिटर्न इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्हेरिफाय करु शकतात. या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक मात्र अपडेट केलेला आहे. पॅनकार्डशी आधारची (Pan-Aadhaar Linking) जोडणी करणे पण आवश्यक आहे. आयटीआर भरण्यास आता बोटावर मोजण्या इतके दिवस राहिले आहे. 31 जुलै 2023 रोजी आयटीआर (ITR) भरण्याची अंतिम मुदत आहे. आधार कार्डद्वारे ई-व्हेरिफिकेशन कसं करतात? काय आहे प्रक्रिया?

तर दंडासह शुल्क

आता इनकम टॅक्स रिटर्न  भरण्याची घाई करा. अंतिम मुदत जवळ आली आहे. 31 जुलै ही शेवटची तारीख आहे. त्यानंतर आयटीआर भरल्यास तुम्हाला विलंब शुल्कासह दंड बसू शकतो. आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयटीआर भरता येईल.

हे सुद्धा वाचा

ई-व्हेरिफिकेशन का गरजेचे?

रिटर्न दाखल करण्यासाठी तुम्हाला आयकर रिटर्न व्हेरिफाय करावा लागेल. जर आयटीआरला वेळेत व्हेरिफाय केले नाही तर ते मान्य करण्यात येत नाही. तुमचे आयटीआरची चौकशी करण्यासाठी पडताळा करणे ही सर्वात जलद प्रक्रिया मानण्यात येते.

आधार कार्डच्या मदतीने असे करा ऑनलाईन ई-व्हेरिफिकेशन

  1. आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांकावर ओटीपी
  2. प्री-व्हॅलिडेटेड बँक खात्याच्या माध्यमातून पाठवलेला ईव्हीसी
  3. प्री-व्हॅलिडेटेड डीमॅट खात्याच्या माध्यमातून जनरेटेड ईव्हीसी
  4. एटीएमच्या माध्यमातून ईव्हीसी (ऑफलाईन पद्धत)
  5. नेट बँकिंग पद्धतीने
  6. डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेटच्या मदतीने
  7. रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर आधार ओटीपी

ही गोष्ट ठेवा लक्षात

आधार बेस्ड वन टाईम पासवर्ड, ओटीपीचा वापर करुन आयटीआरचा पडताळा करता येईल. त्यासाठी मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडलेला असावा. UIDAI डेटाबेसमध्ये मोबाईल क्रमांक आधारशी जोडलेला असावा. पॅन कार्ड पण आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.

आधार क्रमांकाचा वापर करुन आयटीआर ई-व्हेरिफाय कसे करणार

  1. ई-फाईलिंग पोर्टलवर लॉग इन करा. ई-व्हेरिफाय रिटर्न पर्यायावर क्लिक करा.
  2. ई-व्हेरिफाय पेजवर मी आधार सह नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपीचा वापर करुन व्हेरिफाय करु इच्छितो, हा पर्याय निवडा. सुरु ठेवावर क्लिक करा.
  3. एक पॉप-अप विंडो दिसेल. मी आधार तपशील मान्य करण्यासाठी सहमत आहे, हा टिक बॉक्स निवडा.
  4. ‘जनरेट आधार ओटीपी’ वर क्लिक करा.
  5. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर 6 अंकांचा ओटीपी येईल. हा ओटीपी टाका.
  6. त्यानंतर ITR Verify केल्या जाईल. ओटीपी केवळ 15 मिनिटांसाठी वैध असेल.
  7. ट्रान्झॅक्शन आयडीसह एक सक्सेस मॅसेज येईल.
  8. ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत ई-मेल आयडीवर ईमेल पाठविण्यात येईल.