नवी दिल्ली | 04 ऑगस्ट 2023 : 31 जुलै पूर्वी प्राप्तीकर रिटर्न (Income Tax Return) दाखल करणाऱ्यांना करदात्यांना आता रिफंडची प्रतिक्षा आहे. अनेक करदात्यांना असे वाटते की, त्यांनी त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त कर दिला आहे. त्यामुळे ते रिफंड, परताव्याचे हक्कदार आहेत. अनेक जण बँकेतील खात्याचा तपशील वारंवार तपासत आहेत. मोबाईलमध्ये मॅसेज आला की, हे चेक करत आहेत. याचाच फायदा काही जण घेत आहेत. त्यांच्या या गोष्टीचा काही सायबर भामटे फायदा घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्या आनंदावर विरजण पडू शकते. केंद्र सरकारने याविषयीचा अलर्ट दिला आहे. रिफंडच्या (Income Tax Refund) नावाखाली अशी फसवणूक सुरु आहे. तेव्हा करदात्यांनी वेळीच सावध असणे गरजेचे आहे.
मॅसेज व्हायरल
सोशल मीडियावर एक मॅसेज सध्या व्हायरल होत आहे. करदात्याच्या खात्यात 5,490 रुपयांचा आयकर रिफंड आल्याचा दावा मॅसेजमध्ये करण्यात आला आहे. त्यासाठी अनेकांना त्यांचे बँक खाते तपासावे, असा मॅसेज व्हायरल झाला आहे.
राहा सावध
तुम्हाला पण असा मॅसेज आला असेल तर वेळीच सावध व्हा. या मॅसेजमधील लिंकवर क्लिक करु नका. तो फॉरवर्ड करु नका. हा मॅसेज आयकर खात्याने पाठवलेला नाही. सायबर भामट्यांनी करदात्यांना जाळ्यात ओढण्यासाठी असा मॅसेज व्हायरल केला आहे.
घ्या काळजी
पत्र सूचना कार्यालयाने (PIB) फॅक्ट चेकमध्ये हा मॅसेज खोटा असल्याचे सूचित केले आहे. पीआयबीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याविषयीचे ट्विट केले आहे. तुमच्या खात्यात 15,490 रुपये आयटी रिफंड म्हणून जमा करण्यास मंजूरी दिल्याचा दावा या व्हायरल मॅसेजमध्ये करण्यात आला आहे. तुमच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येईल. संपूर्ण माहिती वाचा, अशा प्रकारचा हा मॅसेज खोटा असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा मॅसेज खोटा असून वेळीच सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
A viral message claims that the recipient has been approved for an income tax refund of ₹ 15,490.#PIBFactCheck
✔️ This claim is ????.
✔️ @IncomeTaxIndia has ??? sent this message.
✔️?????? of such scams & ??????? from sharing your personal information. pic.twitter.com/dsRPkhO3gg
— PIB Fact Check (@PIBFactCheck) August 2, 2023
कोणतीही लिंक नाही पाठवली
आयकर खाते त्याच्या नियमानुसार काम करते. आयकर रिफंडची विहित प्रक्रिया आहे. त्यानुसारच परतावा पाठविण्यात येतो. आयकर विभाग रिफंडसाठी तुम्हाला कोणतीही लिंक पाठवत नाही. करदात्यांना याची माहिती असणे आवश्यक आहे. ज्यांना ही गोष्ट माहिती आहे. ते अशा खोट्या मॅसेजला बळी पडत नाही.
नका होऊ सावज
अशा खोट्या मॅसेजमध्ये लिंक शेअर करण्यात येते. त्यावर क्लिक करु नका. तुमचा डेबिट-क्रेडिट कार्ड क्रमांक, त्याचा तपशील सामायिक, शेअर करु नका. हा एकप्रकारचा फिशिंग स्कॅम, फसवणूकीचे जाळे आहे. तेव्हा सावध रहा. सावज होऊ नका. तुमचा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, त्याचा पिन, पासवर्ड, खात्याचा तपशील शेअर करु नका.