मुंबई : इंडियन ऑइल ने त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास सिलिंडर तयार केले आहे. कंपनीने याचे नाव एक्स्ट्रा तेज असे ठेवले आहे. या सिलिंडरचे सर्वात चांगले वैशिष्ट्य म्हणजे तुमचा स्वयंपाक तयार करण्याचा कालावधी 14 टक्के कमी होणार आहे तर तुमच्या गॅसची 5 टक्के बचत होणार आहे. तसेच स्वयंपाक ही लवकर तयार करता येईल. हे सिलिंडर निळ्या रंगाचे आहे. चला तर जाणून घेऊ कोणते ग्राहक या सिलिंडरचा फायदा घेऊ शकतात. इंडियन ऑइल गॅस सिलिंडर हा व्यावसायिक आणि इन्डस्ट्रीच्या वापरासाठी तयार करण्यात आला आहे. घरगुती वापरासाठी याचा उपयोग होणार नाही, एक्स्ट्रा तेज हा घरगुती स्वयंपाकासाठी तयार करण्यात आलेला नाही. हा मोठ्या व्यावसायिक भोजनासाठी वापर होणार गॅस आहे.
एक्स्ट्रा तेज सिलिंडरचे वैशिष्ट्य म्हणजे याची ज्योत तीव्र असते. हा सिलिंडर जास्त दाबाने गॅस सोडतो त्यामुळे स्वयंपाक लवकर होतो. तसेच 5 टक्क्यांपर्यंत एलपीजी गॅसची बचत होते. या सिलिंडरवर स्वयंपाक केल्यास 14 टक्क्यांपर्यंत स्वयंपाकाचा कालावधी घटविता येतो. एक्स्ट्रा तेज सिलिंडरचे प्रेशर जास्त असल्याने तो घरगुती स्वयंपाकासाठी वापरता येऊ शकत नाही. सिलिंडरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची ज्योत. या ज्योतीचे तापमान 65 डिग्री पर्यंत वाढविता येते.
इंडियन एक्स्ट्रा तेज सिलिंडर 19 किलो 47.5 किलो आणि 425 किलो मध्ये उपलब्ध आहे. एक्स्ट्रा तेज सिलिंडरला बुकिंग करण्यासाठी इंडियन ऑइल डिस्ट्रीब्यूटरकडे अगोदर नोंदणी करावी लागेल. अथवा इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाईटवर बुकिंग करावे. या विषयाची माहिती इंडियन ऑइलने दिली आहे. लवकरच एक्स्ट्रा तेज सिलिंडर संपूर्ण देशात विक्री करण्याची योजना असल्याचे वेबसाईटवर सांगण्यात आले आहे.
इंडियन ऑइलने व्यवसायिक एलपीजी सिलिंडरमध्ये calorific value ॲड असते. त्यामुळे उच्च तापमानावर स्वयंपाक करता येतो. एलपीजी सिलिंडर एक्स्ट्रा तेज नावाने तयार केले आहे. calorific value मुळे उच्चतम पातळीवर राहते. एक्स्ट्रा तेज पायलट प्रोजेक्ट दोन वर्षांपूर्वी कर्नाटक मध्ये सुरू करण्यात आला होता. इंडियन ऑइलची रिसर्च टीम यासाठी अनेक वर्षांपासून काम करत आहे.
आता ग्राहकच राजा, उत्पादनातील दोषाची बिनधास्त करा तक्रार , खटल्यांचा निकाल ही लागणार झटपट
आजपासून बँकिंग व्यवहारात होणार ‘हे’ महत्त्वपूर्ण बदल, जाणून घ्या ग्राहकांवर काय होणार परिणाम?