तुम्ही दुसऱ्या राज्यात जाण्याचं नियोजन करत आहात? जाणून घ्या सर्व राज्यांचे नियम एका क्लिकवर

| Updated on: Jul 16, 2021 | 11:09 AM

प्रत्येक राज्याने वेगवेगळे नियम केले आहेत. अशावेळी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणार असाल तर आधी त्या राज्य सरकारची नियमावली जाणून घेणं गरजेचं आहे.

तुम्ही दुसऱ्या राज्यात जाण्याचं नियोजन करत आहात? जाणून घ्या सर्व राज्यांचे नियम एका क्लिकवर
डेल्टा प्लस व्हेरिएंट
Follow us on

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही सुरुच आहे. मात्र, कोरोनाच्या रुग्णसंख्येत काहीशी घट झाल्यामुळे आता अनेक राज्य सरकारांकडून कोरोना नियमावलीत काहीशी शिथिलता देण्यात आली आहे. लॉकडाऊन हटवण्यासोबतच अनेक राज्यांकडून महत्वाचं पाऊलं उचलण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे आता अन्य राज्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी कोरोना चाचणी अहवाल बंधनकारक नसल्याचं अनेक राज्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवेश करताना नागरिकांना होणारा त्रास काही प्रमाणात कमी झाला आहे. (State wise rules for moving from one state to another in India)

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात विमानाने जातानाही कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. मात्र, आता प्रत्येक राज्याने वेगवेगळे नियम केले आहेत. अशावेळी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणार असाल तर आधी त्या राज्य सरकारची नियमावली जाणून घेणं गरजेचं आहे. त्यात कोणत्या राज्याने कोरोना चाचणी बंधनकारक किंवा कोरोना लसीकरण झालेलं असणं गरजेचं केलं आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला सर्व राज्यांतील प्रवेशाबाबत घालण्यात आलेल्या अटींची माहिती देत आहोत.

कोणत्या राज्यात कोणते नियम?

स्पाईसजेट या विमान कंपनीने आपल्या प्रवाशांसाठी माहिती दिली आहे. ज्यात सांगण्यात आलं आहे की कोणकोणत्या राज्यात कोरोना चाचणी अहवाल बंधनकारक आहे. सोबतच कोणत्या राज्यात कोरोना लसीसंदर्भात नियम बनवण्यात आले आहे. स्पाईसजेटने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली, तामिळनाडू, तेलंगणा, पंजाब, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेशात जाणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणी अहवाल बंधनकारक नाही. अन्य राज्यात काय नियम आहेत? जाणून घेऊया

दिल्ली– कोणत्याही रिपोर्टची गरज नाही

तमिलनाडु– कोणत्याही रिपोर्टची गरज नाही

तेलंगाना– कोणत्याही रिपोर्टची गरज नाही

आंध्र प्रदेश– कोणत्याही रिपोर्टची गरज नाही

हिमाचल प्रदेश– कोणत्याही रिपोर्टची गरज नाही

पंजाब– कोणत्याही रिपोर्टची गरज नाही

कर्नाटक– महाराष्ट्र आणि केरळमधून येणाऱ्या नागरिकांसाठी कोरोना चाचणी अहवाल बंधनकारक

आसाम– कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी कोरोना चाचणी अहवालाची गरज नाही

राजस्थान– कोरोना लसीचा एक डोस झालेल्या नागरिकांसाठी कोरोना चाचणी अहवालाची गरज नाही

उडीशा– कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी कोरोना चाचणी अहवालाची गरज नाही

गुजरात– सूरत व्यतिरिक्त अन्य जिल्ह्यात कोरोना चाचणी अहवालाची गरज नाही

बिहार– दरभंगासह महाराष्ट्र, पंजाब आणि केरळमधून येणाऱ्या नागरिकांसाठी कोरोना चाचणी अहवाल बंधनकारक आहे.

उत्तर प्रदेश– महाराष्ट्र आणि केरळमधून येणाऱ्या नागरिकांसाठी कोरोना चाचणी अहवाल गरजेचा

मध्य प्रदेश– दिल्ली आमि महाराष्ट्रातून जबलपूरला जाणाऱ्या नागरिकांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक. महाराष्ट्रातून ग्वाल्हेरला जाणाऱ्या नागरिकांसाठीही कोरोना चाचणी अहवाल गरजेचा आहे.

संबंधित बातम्या :

‘या’ नामी कंपनीच्या सर्व कर्मचार्‍यांनी एकत्र दिला राजीनामा, समस्या न सुटल्यास ही आयडिया वापरा

Aadhar card | आधार कार्डशी संबंधित तक्रार करण्याची नेमकी प्रक्रिया काय?

State wise rules for moving from one state to another in India