नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने दिल्लीस्थित स्टार्टअप हमसफर इंडियाच्या सहकार्याने अल्प प्रमाणात डिझेलची घरोघरी डिलिव्हरी सुरू केली आहे. फ्युएल हमसफर या मोबाईल अॅपद्वारे प्रदान केलेल्या सेवेने पंजाब राज्यातील पटियाला आणि मलेरकोटला या नवीन जिल्ह्यात 20 लिटर सफर20 जेरी कॅनमध्ये डिझेलचे वितरण सुरू केले आहे.
आतापर्यंत डिझेलच्या ग्राहकांना ते किरकोळ दुकानांमधून बॅरलमध्ये विकत घ्यावे लागत होते. त्यावेळी बर्याच समस्यांचा सामना करावा लागत होता आणि कार्यक्षम ऊर्जा वितरण पायाभूत सुविधांचा अभाव होता. मात्र, आता डिझेलची घरपोच डिलिव्हरी होणार असल्याने ही अडचण दूर होईल, असे हमसफर इंडियाच्या संचालक सान्या गोयल यांनी म्हटले.
ही सेवा अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांना 20 लिटरपेक्षा कमी डिझेल हवे आहे. ही सेवा उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, महाराष्ट्र, आसाम, केरळ, गुजरात, गोवा आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) नोएडा, दिल्ली, फरिदाबाद आणि गाझियाबादमध्ये उपलब्ध असेल. फ्यूएल हमसफर नावाचे एक युझर फ्रेंडली अॅप तयार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा आता अधिक चांगल्या प्रकारे वापर केला गेला आहे. ज्यामुळे अमूल्य इंधन सहजपणे ऑर्डर करणे आणि ट्रॅक करणे शक्य होते. या नव्या सेवेमुळे मॉल्स, रुग्णालये, बँका, बांधकाम स्थळे, शेतकरी, मोबाईल टॉवर, शैक्षणिक संस्था तसेच लघुउद्योगांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत IOC चा निव्वळ नफा किरकोळ वाढून 6,360.05 कोटी रुपये झाला आहे. कंपनीने तिमाहीत चांगली कामगिरी केली, परंतु स्टोरेजवर कमी प्राप्तीमुळे नफ्यात किरकोळ वाढ नोंदवली. एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीने 5,941.37 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.
जुलै-सप्टेंबर या तिमाहीत 19 दशलक्ष टन तेलाची विक्री झाल्याचे IOC ने सांगितले. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत त्याची विक्री 17.70 दशलक्ष टन होती. कंपनीच्या रिफायनरींनी या तिमाहीत 152 दशलक्ष टन कच्च्या तेलाचे इंधनात रूपांतर केले. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत हा आकडा 13.9 दशलक्ष टन होता.
संबंधित बातम्या:
देशातील पेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्याकडे जाणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?
…म्हणून मोदी सरकार इंधनावरील कर कमी करण्यासाठी अनुत्सुक?
Petrol Diesel Price: सलग पाचव्या दिवशी इंधन दरवाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव