इंडियन ऑइल (Inidan Oil) नवीन वर्षात लोकांना मोठी भेट दिली आहे. इंडियन ऑइलने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या (Commercial LPG Cylinder) दरामध्ये 100 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला खास दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या (Domestic LPG Cylinder) दरात कोणताही बदल झालेला नाही. व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती कमी झाल्याने काही शहरातील हॉटेलिंगचे बिल कमी होऊ शकते. सध्याचे व्यावसायिक दर पाहता हॉटेलिंग बिलाचा आकार जास्त होता. पण आता इंडियन ऑईलच्या या निर्णायामुळे हॉटेल चालकांच्या खिश्याला बसणारी झळ कमी झाली आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्य ग्राहकांना घराबाहेर आप्त स्वकीयांसोबत जवेणाचा आनंद वाढविणारा ठरु शकतो. व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती देशभरात दोन हजारांच्या आत-बाहेर आहेत.
याआधी डिसेंबर महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. डिसेंबर महिन्यातील एलपीजी सिलेंडरच्या दरात 100 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली. परंतु यावेळी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. ही जनतेसाठी दिलासादायक बाब आहे. व्यवसायिक सिलेंडरच्या दरात कपात झाल्याने रेस्टॉरंट (Restaurant) मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 100 रुपयांच्या किंमत कपातीनंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यवसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 2001रुपये झाली आहे. त्याचबरोबर कोलकत्ता मध्ये व्यवसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 2070 रुपये तर मुंबईत 19 किलोच्या व्यवसायिक एलपीजी सिलेंडर ची किंमत 1951 रुपये झाली आहे.
घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये वाढविण्यात आल्या होत्या. दिवाळीच्या तोंडावर आणि दिवाळीनंतर मात्र एलपीजी सिलिंडरच्या किमती मध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. दिल्ली आणि मुंबईमध्ये विनाअनुदानित 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 899. 50 रुपये आहे. त्याच वेळी कोलकत्ता मध्ये त्याची किंमत 926 रुपये आहे तर चेन्नईमध्ये 14.2 किलो चा घरगुती एलपीजी सिलेंडर 915 .50 रुपयांना मिळत आहे. घरगुती गॅसच्या किंमती गेल्या दोन वर्षात झपाट्याने वाढल्याने घरगुती गॅस ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. गॅसच्या किंमती कमी होण्याची ते वाट पाहत आहेत.
तुमच्या शहरातील गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही सरकारी तेल कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर ते पाहू शकता यासाठी तुम्ही IOCl वेबसाईट वर
(cx.indianoil.in/webcenter/portal/Customer/pages_productprice) जाऊन त्यानंतर वेबसाइटवर राज्य जिल्हा वितरक याची निवड करा नंतर शोध प्राइड पर्यायावर क्लिक करा यानंतर गॅस सिलिंडरच्या किमती तुमच्यासमोर येतील.
Happy New Year : हेमांगी कवीनं ‘अशा’ हटके स्टाइलमधून दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा, पाहा Video