नवी दिल्ली | 4 जानेवारी 2024 : भारतीय रेल्वेने दररोज कोट्यवधी प्रवाशी प्रवास करतात. पण अनेकदा अचानक आलेल्या अडचणी, धूकं वा इतर काही कारणांमुळे ट्रेन सुटते. पण माहिती नसल्याने अनेकदा प्रवाशी नवीन तिकीट खरेदी करतात आणि दुसऱ्या दिवशी प्रवास करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही एकाच तिकीटावर 2 दिवसांनी पण प्रवास करु शकतात. ते पण एक रुपया खर्च न करता. चला तर जाणून घ्या, विना पैसे खर्च करता, तुम्ही एकाच तिकीटावर 2 दिवसात कसा प्रवास करु शकता ते…
नियम ठरतो उपयोगी
भारतीय रेल्वेच्या एका नियमानुसार, तुम्ही तिकीट खरेदी केले आणि अडचणीमुळे तुम्हाला प्रवास करता आला नाही तर, त्याच तिकीटावर तारीख बदलून तुम्हाला प्रवास करता येतो. त्यासाठी वेगळे कोणतेही शुल्क द्यावे लागणार आहे. तुम्ही त्या तिकीटावर 2 दिवसांनी पण प्रवास करु शकतात. अर्थात त्यासाठी नियम आहे. त्याआधारे तुम्हाला हा प्रवास करता येईल.
काय आहे ट्रेनमधून प्रवासाचा नियम ?
अनेकदा प्रवाशांची ट्रेन सूटते. अशावेळी रेल्वे तुम्हाला पुढील दोन थांब्यांपर्यंत, स्टॉपपर्यंत ट्रेनमध्ये प्रवास करण्याची संधी देते. त्यानंतर तुम्ही तुमचा प्रवास पूर्ण करु शकतात. प्रवाशी प्रवासात अडचण नको म्हणून अगोदरच तिकीट खरेदी करतात. पण काही कारणांमुळे त्यांच्या प्रवासाच्या योजनेत बदल होतो. अशावेळी त्यांना नवीन तिकीट खरेदी करण्याची गरज नसते. त्याच तिकीटावर त्यांना प्रवास करता येतो. पण अशावेळी तुमचा कोच बदलू शकतो.
ट्रेन सूटली तर काय कराल?
तुमचा प्रवास सुरु ठेवण्यासाठी तुम्हाला तिकीट कलेक्टरशी बोलावे लागेल. तो तुमचे तिकीट तयार करुन देईल. तुमची ट्रेन जर सुटली तर, तुम्हाला दोन स्टेशननंतर ही या तिकीटावर प्रवास करता येतो. तोपर्यंत तो तुमचे तिकीट दुसऱ्या कोणाला देऊ शकत नाही.
ब्रेक घेऊन पुन्हा प्रवास
या नियमाविषयी अनेक लोकांना माहितीच नाही. तुम्ही 500 किमीपेक्षा जास्त प्रवास करत असाल, तर तुम्ही ब्रेक घेऊ शकता. तुमचा प्रवास एक हजार किलोमीटरचा असेल तर तुम्ही दोनदा ब्रेक घेऊ शकता. जेव्हा तुम्ही प्रवासाला सुरुवात करतात आणि उतरता, या दरम्यान दोन दिवसांचा ब्रेक घेता येतो. हा नियम शताब्दी, जनशताब्दी आणि राजधानी या सारख्या आलिशान रेल्वेसाठी लागू नाही.