मुंबई : कोरोनानंतर जग संपूर्णता बदलले आहे. अनेकांच्या नोक-या गेल्या. तर वर्क फॉर्म होमची (Work From Home) संकल्पना चांगलीच रुजली. यादरम्यान अस्थायी काम करणा-यांची संख्या आणि अस्थायी मार्केट कॅप मध्ये प्रचंड वाढ झाली आहे. चांगला दाम घरबसल्या मिळत असल्याने अनेकांनी फ्रीलान्सिंगचा (Freelancing) पर्याय निवडला आहे. पण या क्षेत्रातील कर्मचा-यांना आतापर्यंत विम्याचे संरक्षण मिळत नव्हते. हीच त्रुटी हेरत अनेक विमा कंपन्यांनी आता अस्थायी कामगार आणि फ्रीलान्सर साठी न्यू ऐज इन्शुरन्स पॉलिसी (New Age Insurance Policy) बाजारात दाखल केली आहे. ठराविक कालावधीसाठी, कॉन्ट्रॅक्टवर काम करणा-या कर्मचा-यांसाठी ही पॉलिसी वरदान ठरत आहे. इश्योरटेक कंपन्यांनी या विमा क्षेत्रात आघाडी घेतली आहे. त्यानुसार, तंत्रज्ञानावर आधारित या कंपन्या विमा क्षेत्रात उतरल्याने फ्रीलान्सरचे आयुष्य सुकर होणार आहे. त्यांच्या ही आयुष्याला मोल आले आहे. चला तर जाणून घेऊयात या विम्यासंदर्भात
बाजारात आजघडीला एक वर्ष विमा संरक्षण देणा-या पॉलिसी उपलब्ध आहेत. त्यांच्या खरेदीची प्रक्रिया पण सोपी नाही. त्यामुळे अस्थायी कामगार (Gig Workers) आणि फ्रीलान्सर हे विमा संरक्षणापासून दूर होते. Policybazar.com चे विमा विभागाचे वरिष्ठ अधिकारी रघुवीर मलिक यांच्या मते, विमा कंपन्यांची या क्षेत्रात भरीव योगदानाची अपेक्षा फोल ठरल्यानंतर इश्योरटेक कंपन्यांनी विमा क्षेत्रात अस्थायी कर्मचा-यांसाठी प्रवेश केला आहे. नियमीत वेतन प्राप्त न करणा-या कर्मचा-यांसाठी या कंपन्या विमा संरक्षण देत आहेत. नियमीत वेतन नसल्याने विमा कंपन्या या कामगारांना विमा संरक्षण देत नव्हत्या.
न्यू ऐज इन्शुरन्स कंपन्या अत्यंत माफक आणि कमी कालावधीसाठी विमा संरक्षण पुरवितात. यामध्ये प्रत्येक दिवसापासून ते आठवडाभरासाठी विमा संरक्षण देण्यात येते. अस्थायी कामगार स्वतः हे संरक्षण घेऊ शकतात अथवा ज्या कंपन्या, स्टार्टअपमध्ये ते काम करत आहेत. त्या सुद्धा कामगारांसाठी असे विमा संरक्षण खरेदी करु शकतात.
एसोचेम च्या एका अहवालानुसार, 2024 पर्यंत भारतात अस्थायी क्षेत्रात 17 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. याचे बाजार मुल्य 455 अब्ज डॉलर होण्याचा अंदाज आहे. तर 2025 मध्ये या क्षेत्रात काम करणा-यांची संख्या 35 कोटींच्या घरात पोहचेल अशी शक्यता आहे. त्यामुळे अस्थायी कामगारांसाठी इश्योरटेक कंपन्यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. प्रोबस इन्शुरन्स, कवरफॉक्स, प्लम बेनिफिट्स इत्यादी इश्योरटेक कंपन्या सध्या कार्यरत आहेत.
संबंधित बातम्या :
Car Insurance | वाहन विमा घेताय? या गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष; चांगल्या डीलसाठी रहा आग्रही
तुम्ही पत्नीला संपत्तीमध्ये नॉमिनी केलंय? नसेल तर आजच करा; भविष्यातील संकटे टाळा