मुंबई : म्युचुअल फंडात गुंतवणुकीची संधी शोधत असाल तर ही जबरदस्त बातमी तुमच्यासाठी. अॅक्सिस म्युचुअल फंडात (Axis Mutual Fund) गुंतवणुकीची नामी संधी चालून आली आहे. गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी या फंडने अॅक्सिस निफ्टी मिडकॅप 50 इंडेक्स फंड (Axis Nifty Midcap 50 Index Fund) बाजारात दाखल करण्याची घोषणा केली आहे. हा एक ओपन-एंडेड इंडेक्स फंड आहे. निफ्टी मिडकॅप 50 इंडेक्स फंडावर याची वाटचाल असेल. न्यू फंड ऑफरची (NFO) 10 मार्चपासून नोंदणी सुरु झाली असून त्यात 21 मार्च 2022 पर्यंत गुंतवणू करता येईल. निफ्टी मिडकॅप 50 इंडेक्समध्ये निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्स पूर्ण मार्केट कॅपवर आधारीत अग्रेसर 50 कंपन्यांचा समावेश आहे. त्यांच्या घौडदौडीचा आलेख एनएसईवर उपलब्ध आहे. गेल्या सहा महिन्यांची सरासरी उपलब्ध असून त्याआधारे निर्देशांकाला अर्धवार्षिक आधारावर(मार्च आणि सप्टेंबर) पुनर्स्थापित करण्यात येते.
निफ्टी मिडकॅप 50 इंडेक्समध्ये निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्स पूर्ण मार्केट कॅपवर आधारीत अग्रेसर 50 कंपन्यांचा समावेश आहे. अॅक्सिस निफ्टी मिडकॅप 50 इंडेक्स फंड यामध्ये गुंतवणूक करणार आहे. त्यात एनएसईवरील फ्यूचर आणि ऑप्शन्स कराराआधारे व्यापार करण्यात येतो. गुंतवणुकदारांसाठी यामध्ये विविध पोर्टफोलिओ असतील. त्याआधारे स्टॉक निवडणे गुंतवणुकदारांना सहंजसोपे होईल.पूर्ण मार्केट कॅप आधारे निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्समध्ये फ्युचर आणि ऑप्शनमधील घटकांची क्रमवारीता निफ्टी मिडकॅप 30 वर अवलंबून असेल. अचानक मार्केट कोसळले तरी या 30 कंपनांच्या सर्वोत्तम कामगिरीआधारे उच्चत्तम सरासरीवर गुंतवणुकदारांना फायदा मिळेल. निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्समधील अग्रेसर 30 फ्युचर आणि ऑप्शन घटकांची त्याआधारे निवड करण्यात येईल. अॅक्सिस निफ्टी मिडकॅप 50 इंडेक्स फंड हा बाजाराधीन गुंतवणूक योजनेवर काम करतो. बाजाराआधारीत परतावा देण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे.
या फंडात उडी घ्यायची असेल तर कमीतकमी 5000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर पटीत गुंतवणुकदाराला गुंतवणूक करता येईल. या योजनेतून बाहेर पडण्यासाठी नियम आहेत. त्यासाठी तुम्हाला ठराविक कर आकारण्यात येणार आहे. निर्धारीत वेळेपूर्वी योजनेतून बाहेर पडण्यासाठी 1 टक्के रक्कम अदा करावी लागेल. त्यानंतर यावर रक्कम अदा करण्याची गरज राहत नाही. अॅक्सिस एएमसी चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रेश निगम यांच्या म्हणण्यानुसार, मिडकॅपने बाजारात त्यांची छाप सोडली आहे. दीर्घकालीन चांगल्या परताव्यासाठी हा चांगला दावेदार मानला जातो. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकदारांसाठी एका आकर्षक गुंतवणुकीसह एक जोखीम परतावाही देण्यात येतो.
इतर बातम्या