मुंबई: अलीकडच्या काळात आधार कार्ड प्रत्येक दैनंदिन व्यवहाराचा आवश्यक भाग झाले आहे. विशेषत: आर्थिक व्यवहारांसाठी आधार कार्डाला प्रथम प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच सध्या EPFO, बँक खाते, मोबाईल नंबर अशा सर्वच गोष्टी आधारला लिंक (Aadhar Link) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. (Link LIC policies with aadhar numbers know all the details)
तुमच्याकडे LIC ची पॉलिसी असेल तर ती आधारला लिंक करणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने 30 जूनपर्यंतची मुदत दिल्याचे सांगितले जाते. मात्र, याबाबत अद्याप बराच संभ्रम आहे.
‘मनी 9’च्या माहितीनुसार, ग्राहकाला केवायसीमध्ये आधार कार्ड जमा करायचे असेल तर तो करु शकतो. आधार स्तंभ आणि आधाऱ शिला यासारख्या पॉलिसीजसाठी आधार कार्ड क्रमांक गरजेचा आहे. त्यामुळे या पॉलिसी खरेदी करायच्या असल्यास आधार कार्ड देणे बंधनकारक आहे. एलआयसीच्या अन्य योजनांच्या तुलनेत या योजनांचा प्रीमियम खूपच कमी आहे, पण फायदे मात्र जास्त आहेत.
– आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगिन करा.
– इथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
– त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.
– यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.
– सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा.
पॅनशी आधार जोडण्याची प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे करता येते. आपण इच्छित असल्यास आपण एसएमएसद्वारे पॅन आणि आधार देखील लिंक करू शकता. यासाठी आपल्याला UIDPAN <SPACE>12 अंकी आधार क्रमांक> <SPACE> <10 अंकी PAN> लिहून 567678 नंबरवर किंवा 56161 वर मेसेज पाठवावा.
पॅनकार्डसह आधार लिंक करण्यासाठी अधिकृत आयकर वेबसाईट https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वर जा. ‘लिंक आधार’ वर क्लिक करा. हे केल्यानंतर एक नवीन पृष्ठ उघडेल. त्यात पॅन, आधार क्रमांक आणि आपले नाव भरा. जर आपल्या आधारवर फक्त जन्माचे वर्ष लिहिले गेले असेल तर आपणास हा पर्याय निवडावा लागेल – ‘आधार कार्डमध्ये माझ्याकडे फक्त जन्माचे वर्ष आहे’. आता कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि लिंक आधारावर क्लिक करा. हे केल्यावर प्रक्रिया पूर्ण झालेलं पृष्ठ उघडेल, ज्यामध्ये पॅनशी संबंधित माहिती दिसेल.
ऑफलाईन लिंकसाठी आपल्याला PAN सेवा प्रदाता, NSDL किंवा UTIITSL च्या सेवा केंद्रास भेट द्यावी लागेल. येथे ‘Annexure-I’ फॉर्म भरावा लागेल आणि पॅनकार्ड व आधार कार्डची प्रत सोबत अन्य काही कागदपत्रेही कॉपी करावी लागतील. या वेळी आपल्याला निश्चित फी देखील द्यावी लागेल. या प्रक्रियेद्वारे आपण पॅनला आपल्या आधारशी लिंक करू शकता.
(Link LIC policies with aadhar numbers know all the details)