Gold Investment: दिवाळीत सोन्याचा भाव वाढणार का, काय असेल ट्रेंड?

| Updated on: Oct 31, 2021 | 10:01 AM

Gold price | जागतिक सुवर्ण परिषदेच्या ताज्या अहवालानुसार, सप्टेंबरच्या तिमाहीत देशातील सोन्याच्या मागणीत वार्षिक तुलनेत 47 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूण मागणी 139.10 टन इतकी होती. सप्टेंबर 2020 च्या तिमाहीत हा आकडा 94.60 टन होता. याशिवाय दागिन्यांची मागणीही वार्षिक आधारावर58 टक्क्यांनी वाढून 96.20 टन झाली आहे.

Gold Investment: दिवाळीत सोन्याचा भाव वाढणार का, काय असेल ट्रेंड?
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

नवी दिल्ली: कमोडिटी मार्केट तज्ज्ञांच्या मते, येत्या 12 महिन्यांत सोन्याचा भाव 52-53 हजारांपर्यंत पोहोचू शकतो. 2021 मध्ये आतापर्यंत सोन्याचा दर 47 हजार ते 49 हजाराच्या दरम्यान राहिला आहे. सोन्याचा एकूण प्रवास पाहता 2019 मध्ये सोन्याच्या दरात 52 टक्के आणि 2020 मध्ये 25 टक्के वाढ झाली होती.

अमेरिकन डॉलर आणि रोखे बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याच्या किमतीवर दबाव दिसून येत आहे. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत आर्थिक सुधारणांचा वेग अपेक्षेपेक्षा चांगला होता. त्यामुळे सोन्याबाबत गुंतवणूकदारांची उत्सुकता थंडावली होती. दुसऱ्या सहामाहीत जागतिक अर्थव्यवस्था अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नाही. अशा स्थितीत पुन्हा एकदा सोन्यामध्ये गुंतवणूक वाढून त्याची किंमत वाढण्यास सुरुवात होईल, असे कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे मत आहे.

जागतिक सुवर्ण परिषदेच्या ताज्या अहवालानुसार, सप्टेंबरच्या तिमाहीत देशातील सोन्याच्या मागणीत वार्षिक तुलनेत 47 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूण मागणी 139.10 टन इतकी होती. सप्टेंबर 2020 च्या तिमाहीत हा आकडा 94.60 टन होता. याशिवाय दागिन्यांची मागणीही वार्षिक आधारावर58 टक्क्यांनी वाढून 96.20 टन झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही महिन्यांत सोन्याचा दर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारात $2000 च्या पुढे जाईल.

यंदाच्या दिवाळीत सोनं स्वस्तात मिळणार?

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत सोनं स्वस्त राहण्याचा अंदाज नाशिकमधील सराफा व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात आला आहे. गेल्यावर्षी दिवाळीच्या काळात सोन्याचा प्रतितोळा दर 51000 रुपये इतका होता. मात्र, यंदा सोन्याचा प्रतितोळा दर 47000 ते 47500 रुपये इतका असेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

सोन्याची शुद्धता कशी तपासता येईल?

सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.
या अॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या (गोल्ड) माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबतची माहितीही लगेच मिळणार आहे.

संबंधित बातम्या:

दसऱ्याला खरे सोने लुटताय ना? नव्या गोकाक कलेक्शनची महिलांना भुरळ, वाचा औरंगाबादचे भाव

Gold Today: सणाला मिळतेय सोन्याची साथ, ऐन दिवाळीत भावात घट, वाचा औरंगाबादचे भाव अन् लेटेस्ट ट्रेंड

गोल्ड स्कीममध्ये पैसे लावणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास काय होणार?