मुंबई: कोरोना काळात आयटी कंपन्यांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या दीड वर्षात अनेक आयटी कंपन्यांच्या नफा कित्येक पटींनी वाढला आहे. साहजिकच यामुळे या कंपन्यांचे भांडवली बाजारातील मूल्यही तितकेच वाढले आहे. त्यामुळे भांडवली बाजारात आयटी कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळताना दिसत आहे.
सध्या शेअर बाजारात अशाच एका आयटी कंपनीची जोरदार चर्चा सुरु आहे. बंगळुरूस्थित Mphasis Limited (MPHL) कंपनीने गेल्या वर्षभरात गुंतवणुकदरांना तब्बल 150 टक्के रिटर्न्स दिले आहेत. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात Mphasis Limited च्या एका समभागाची किंमत 1,198 रुपये इतकी होती. मात्र, वर्षभरानंतर म्हणजे 23 ऑगस्ट 2021 रोजी या कंपनीच्या समभागाने 3001.65 रुपयांची पातळी गाठली होती. याचा अर्थ वर्षभरापूर्वी एखाद्याने या कंपनीचे पाच लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्याचे मूल्य 12.52 लाख रुपयांच्या घरात गेले आहे. सोमवारी एकाच सत्रात Mphasis Limited च्या समभागाने 5.46 टक्क्यांची उसळी घेतली होती.
Mphasis Limited कंपनीचे एकूण भांडवली मूल्य 53,700 कोटी रुपये इतके आहे. या कंपनीवर कर्जाचा बोझाही कमी आहे. गेल्यावर्षी जून तिमाहीत कंपनीला 275.12 कोटींची नफा झाला होता. यंदा याच कालावधीच कंपनीने 339.69 कोटींचा नफा कमावला आहे. त्यामुळे आगामी काळात टेक्निकल अॅनालिससनुसार Mphasis Limited कंपनीच्या समभागाचा भाव आणखी वधारण्याची शक्यता आहे.
सध्या शेअर बाजारात महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या (MLL) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 192 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. 27 जुलै 2020 रोजी महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या शेअरचा भाव 276.7 रुपये इतका होता. आता याच समभागाची किंमत 807.30 इतकी झाली आहे. याचा अर्थ वर्षभरापूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने महिंद्रा लॉजिस्टिक्सचे एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्यांची किंमत साधारण 14.58 लाखांच्या घरात गेली आहे.
संबंधित बातम्या:
Share Market: ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; वर्षभरात 400 टक्के रिटर्न्स