मुंबई : अनेक जणांना नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने वारंवार शहरे तसेच आपल्या राहण्याचे ठिकाण बदलावे लागते. अशावेळेस सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे तुम्ही जिथे जाणार आहात तिथे तुमचे गॅस कनेक्शन ट्रान्सफर करणे. तुम्ही जर यापैकीच एक असाल आणि तुम्हाला तुमचे गॅस कनेक्शन ट्रान्सफर करण्यासाठी काही समस्या येत असतील, गॅस कनेक्शन ट्रान्सफर कसे कारायचे? हे माहीत नसेल तर टेन्शन घेऊ नका. आज आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत.
गॅस कनेक्शन ट्रान्सफर करण्यासाठी सर्वात प्रथम तुमचे सध्या जिथे कनेक्शन आहे, त्या गॅस एजन्सीमध्ये तुम्हाला जावे लागेल. तिथे गेल्यानंतर तुम्हाला गॅस रेग्युलेटर आणि सिलिंडर जमा करावे लागेल. तुम्ही या दोन गोष्ट गॅस एजन्सीमध्ये जम केल्यास तुम्हाला गॅस एजन्सीकडून तुमचे डिपॉझिट परत मिळते. त्यानंतर गॅस एजन्सीकडून तुम्हाला एक फॉर्म देण्यात येतो. ज्या फॉर्ममध्ये तुम्ही तुमचे गॅस कनेक्शन कोणत्या गावात, शहरात ट्रान्सफर केले आहे त्याचा उल्लेख असतो. या फॉर्मवरच पुढील गॅस कनेक्शन मिळणार असल्याने हा फार्म निट सांभाळून ठेवा. फॉर्म हरवल्यास पुन्हा नवे कनेक्शन घेण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते.
दरम्यान ह फॉर्म मिळाल्यानंतर आता तुम्हाला ज्या शहरात गॅस कनेक्शन हवे आहे. तुम्ही ज्या शहरात राहण्यासाठी गेला आहात, त्या शहरातील तुमच्या घराजवळ असलेल्या गॅस एजन्सीशी संपर्क साधा. त्यांना हा फॉर्म दाखवा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पहिल्या गॅस एजन्सीकडून मिळालेले डिपॉझिट या गॅस एजन्सीमध्ये जमा करा. डिपॉझिट जमा करताच ते तुम्हाला गॅसचे नवे कनेक्शन देतील. अशाप्रकारे आपण सहज आणि सोप्या पद्धतीने देशभरात कुठेही गॅस कनेक्शन सहज ट्रान्सफर करू शकतो. गॅस कनेक्शन ट्रान्सफर करताना फक्त एकच काळजी घ्यावी की ती एजन्सी तुमच्या घराजवळ असावी, एजन्सी घराजवळ असल्याने सिलिंडरची डिलिव्हरी करणे सोपे जाते.
सोन्या, चांदीच्या दरात तेजी; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
घाऊक महागाईच्या दरात पुन्हा वाढ; अन्नधान्य, भाजीपाला सर्वच गोष्टी महागल्या