ATM Transactions Limit : ऑनलाईन बँकिंगच्या युगात बहुतेक काम डिजिटल झाले आहे. परंतु अनेक प्रकारच्या गरजांसाठी रोख रक्कम आवश्यक आहे. अशा परिस्थितीत एटीएममधून रोख रक्कम काढावी लागते. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही एका दिवसात ATM मधून किती पैसे काढू शकता? वेगवेगळ्या बँकांमध्ये याबाबत वेगवेगळे नियम आहेत.
SBI ATM transaction Limit : स्टेट बँक ऑफ इंडिया- देशातील सर्वात मोठी बँक SBI च्या नियमांनुसार तुम्ही एका दिवसात ATM मधून कमीत कमी 100 आणि जास्तीत जास्त 20 हजार रुपये काढू शकता. ग्लोबल इंटरनॅशनल कार्डमधून 40 हजार आणि गोल्ड इंटरनॅशनल कार्डमधून 50 हजार रुपये काढता येतात.
पंजाब नॅशनल बँकेत फक्त 250 रुपयांमध्ये उघडा हे खाते
HDFC ATM transaction Limit : एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या प्लॅटिनम डेबिट कार्डद्वारे बँक दररोज 1 लाख रुपये रोख काढण्याची परवानगी देते. तथापि, इतर कार्डांवर मर्यादा कमी आहे.
ICICI Bank ATM Transaction Limit : आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही प्लॅटिनम चिप कार्डद्वारे 1 लाख रुपयांपर्यंत रोख रक्कम काढू शकता. त्याचबरोबर व्हिसा सिग्नेचर डेबिट कार्डद्वारे 1.5 लाख रुपये काढता येतात.
आरबीआयच्या नियमांनुसार, जर तुम्ही एका महिन्यात मर्यादेपेक्षा जास्त ATM वापरता, तर त्यासाठी तुम्हाला बँकेने ठरवलेले शुल्क भरावे लागेल. बहुतेक बँका आपल्या ग्राहकांना महिन्यातून 5 वेळा मोफत एटीएम व्यवहार करण्याची सुविधा देतात, तर महानगरांमध्ये ही मर्यादा 3 आहे.