नवी दिल्ली- सोन्याच्या भावात (Gold price) आज (सोमवारी) किंचित तेजी दिसून आली. राजधानी दिल्ली मध्ये शुक्रवारी सोन्याच्या बाजार 100 रुपयांच्या वाढीसह बंद झाला. गेल्या आठवड्याच्या (शुक्रवार) तुलनेत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव (Gold rate today) 100 रुपयांनी वधारला. ‘गुड रिटर्न’ वेबसाईटच्या वृत्तानुसार, 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 47,090 रुपयांवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील मौल्यवान धातूंच्या किंमतीमधील (Gold price in Delhi) तेजीचा परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसून येत आहे. सोन्यासोबत चांदीच्या भावातही तेजीचं चित्र दिसून आलं. आज (सोमवारी) चांदीच्या भावात 300 रुपयांची वाढ दिसून आली. प्रति किलो चांदींचा भाव 62,000 रुपयांवर पोहोचला. काल (शुक्रवारी) चांदीचा भाव 61,700 रुपये प्रति किलो नोंदविला गेला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भाव 1,826 डॉलर प्रति औंस आणि चांदीच्या भाव 23.19 डॉलर प्रति औंसवर स्थिर राहिला.
देशातील प्रमुख शहरातील सोने-चांदीच्या भावाविषयी माहिती देणाऱ्या ‘गूडरिटर्न्स डॉट कॉम’ वेबसाईटवर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याच्या किंमती पुढीलप्रमाणे:
चेन्नईत सोन्याचे दर: ₹45,340
मुंबई सोन्याचे दर: ₹47,090
दिल्ली सोन्याचे दर: ₹47,140
कोलकाता सोन्याचे दर: ₹47,190
बंगळुरु सोन्याचे दर: ₹44,990
हैदराबाद सोन्याचे दर: ₹44,990
केरळ सोन्याचे दर: ₹44,990
पुणे सोन्याचे दर: ₹46,450
सोन्याचे भाव एका मिस्ड् कॉलवर:
तुम्ही घरबसल्या सोन्याचे भाव मिळवू शकतात. 8955664433 या क्रमांवर मिस्ड् कॉल देण्याद्वारे तुम्हाला मेसेज प्राप्त होतील. तुम्ही प्रमुख शहरातील सोन्याचे भाव तपासू शकतात.
सोन्याची शुद्धता ‘अॅप’ वर?
केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अॅप लाँच केलं आहे. या अॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे (BIS care app will tell how pure is gold).