नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा परिणाम सोने-चांदीच्या भावावर दिसून आला. राजधानी दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याच्या भावात 154 रुपयांची वाढ नोंदविली गेली. चांदीच्या एक किलोग्रॅम भावात 352 रुपयांनी वाढ झाली. आर्थिक विश्लेषकांच्या मतानुसार, आगामी काळात सोन्याच्या किंमती अधिक वाढण्याची शक्यता आहे.
कोविड बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सार्वजनिक वावरावर पुन्हा निर्बंध लावले जात आहे. लॉकडाउनच्या शक्यतेमुळे अर्थचक्र मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीमधील वाढ पुढील 15 दिवसांत कायम राहण्याची सर्वाधिक शक्यता आहे.
वृत्तसंस्था पीटीआय आणि एचडीएफसी सिक्युरिटीने जारी सोन्याचे आजचे भाव घोषित केले आहेत. दिल्लीच्या सराफ बाजारात दहा ग्रॅम सोन्याचे भाव 46,815 वरुन 46,969 रुपयांवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने 1,816 डॉलर प्रति औंसचा टप्पा गाठला आहे.
HDFC सिक्युरिटीच्या अनुसार, राजधानी दिल्लीत एक किलोग्रॅम चांदीचे भाव 60373 रुपयांवरुन 60725 वर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या भावाने वाढीसह 22.92 डॉलर प्रति औंसचा टप्पा गाठला आहे.
मोतीलाल ओस्वालचे व्हाईस प्रेसिडेंट नवनीत दमानी यांनी सोन्या-चांदीच्या भाववाढीवर भाष्य केले आहे. ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे मौल्यवान धातूंची रिकव्हरी कमी प्रमाणात होईल. त्यामुळे आगामी काळात सोने-चांदीचे भाव पुन्हा वाढणार असल्याची शक्यता दमानी यांनी व्यक्त केली आहे.
ओमिक्रॉन विषाणूचा प्रादूर्भाव, फेडरल रिझर्व्हद्वारे व्याजदरात वाढ, डॉलरचा सावरलेला भाव, कच्चा इंधनाच्या भावांतील चढ-उतारांचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या भावावर जाणविण्याची शक्यता असल्याचे कमोडिटी मार्केटच्या विश्लेषकांनी म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत वर्ष 2022 मध्ये बाजारभावात सोने-चांदी उजळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जागतिक स्तरावर कोविड बाधितांच्या आकड्यात होणारी वाढीमुळे बाजारात अस्थिरतेचे वातावरण आहे. सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून सोने-चांदीला प्राधान्यात वाढ होत आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव 55,000 हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज आहे.
इतर बातम्या
Income Tax Return : चुकीला ‘एकदा’ माफी; 31 डिसेंबरची मुदत टळली, तुमच्यासमोरीला ‘हा’ पर्याय!
Bank | देशातील पहिली थेट पेमेंट बँक, अर्थजगतात एन्ट्री करणाऱ्या नव्या बँकेचं नाव आहे ‘एअरटेल पेमेंट’