मुंबई : विमा क्षेत्रातील दादा कंपनी आणि देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेली आयुर्विमा महामंडळ (Life insurance corporation) ही देशांतर्गत बाजारात सर्वाधिक 64.1 टक्के हिस्सेदारी असणारी तसेच इक्विटीवर (Equity) सर्वाधिक 82 टक्के परतावा देणारी जगातील आघाडीची कंपनी ठरली आहे. 2020 मध्ये देशांतर्गत बाजारपेठेत एलआयसीचा वाटा 64.1 टक्क्यांहून अधिक होता. क्रिसिलच्या (crisil) अहवालानुसार, एलआयसी (LIC) ही आयुर्विमा प्रीमियमच्या बाबतीत जगातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. क्रिसिलने नोव्हेंबर 2021 मध्ये तयार केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. आता हा अहवाल प्राप्त झाला आहे. सकल लिखीत हप्त्यांचा (GWP) विचार करता हा देशातंर्गत बाजारपेठेत 64.1 टक्के आहे तो बाजार मुल्यांनुसार 56.045 अब्ज डॉलर इतका आहे. बाजारात इतकी रक्कम असलेल्या जगातील अन्य कोणत्याही कंपनीपेक्षा बाजारातील एलआयसीची हिस्सेदारी अधिक आहे. मार्च 2021 पर्यंत 13.5 लाख एजंट एलआयसीशी जोडले गेले होते, जे देशातील एकूण एजंट नेटवर्कच्या 55 टक्के आहे. IPO आणण्याच्या तयारीत असलेल्या आयुर्विमा महामंडळाच्या संचालक मंडळात सहा स्वतंत्र संचालकांचा समावेश करण्यात आला आहे.
2000 पूर्वीच्या काळात एलआयसीचा बाजारातील हिस्सा 100 टक्के होता, जो हळूहळू कमी झाला. 2016 मध्ये 71.8 टक्क्यांपर्यंत खाली आला. 2020 मध्ये एलआयसीचा बाजारातील हिस्सा आणखी कमी होऊन 64.1 टक्क्यांवर आला.देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी असलेल्या एसबीआय लाइफचा 2016 मध्ये केवळ पाच टक्के आणि 2020 मध्ये आठ टक्के बाजार हिस्सा आहे. तर सकल लिखीत हप्त्यांचा (GWP) विचार करता हा देशातंर्गत बाजारपेठेत 64.1 टक्के आहे तो बाजार मुल्यांनुसार 56.045 अब्ज डॉलर इतका आहे. बाजारात इतकी रक्कम असलेल्या जगातील अन्य कोणत्याही कंपनीपेक्षा हा बाजारातील एलआयसीची हिस्सेदारी अधिक आहे.मार्च 2021 पर्यंत, 13.5 लाख एजंट एलआयसीशी जोडले गेले होते, जे देशातील एकूण एजंट नेटवर्कच्या 55 टक्के आहे. ही आकडेवारी एसबीआय लाइफपेक्षा 7.2 पट जास्त आहे.
बाजारातील हिस्सेदारीत दुसऱ्या कंपनीपेक्षा इतक्या मोठ्या फरकाने अग्रेसर असणारी एलआयसी ही जगातील एकमेव कंपनी आहे. अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये एसबीआय लाईफचा बाजारातील हिस्सा केवळ 8 टक्के होता तर एलआयसीचा 64.1 टक्के होता. मात्र नफ्याबाबत बोलायचे झाल्यास एलआयसीचा नफेवारीतील क्रमांक हवा तसा पुढे नाही. तरीही आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये एलआयसीचे केवळ 40.6 कोटी रुपयांच्या निव्वळ उत्पन्न आहे. जे सरासरीपेक्षा कमी आहे.
एलआयसी आणि पॉलिसीबाजार (Policybazaar) यांनी करार केला आहे. याअंतर्गत दोन्हींचे ग्राहक मुदत विमा (Term Insurance) आणि इतर उत्पादनात गुंतवणूक करु शकतात. या मोठ्या कराराचा उद्देश देशभरातील जीवन विमा उत्पादनांचे डिजिटल वितरण सुलभ करणे हा आहे, अर्थात यामुळे ग्राहकांना मोबाईलवरुनही सहज विमा खरेदी करता येईल.
IPO आणण्याच्या तयारीत असलेल्या आयुर्विमा महामंडळाच्या संचालक मंडळात सहा स्वतंत्र संचालकांचा समावेश करण्यात आला आहे. या नियुक्त्यांमुळे एलआयसीच्या मंडळावरील स्वतंत्र संचालकांची संख्या नऊ झाली असून, सर्व रिक्त जागा भरण्यात आल्या आहेत. कॉर्पोरेट गव्हर्नन्सशी संबंधित नियामक नियमांची पूर्तता करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
इतर बातम्या
PVC Aadhaar Card: संपूर्ण कुटुंबाचा मजबूत जोड, एका मोबाईल क्रमांकावर संपूर्ण कुटुंबासाठी आधार कार्ड
अर्थसंकल्पानंतर रिझर्व्ह बँकेकडे नजरा, रिव्हर्स रेपोत रेटमध्ये बदलाचा तज्ज्ञांचा अंदाज
‘या’ कंपनीचा सॅलरी पॉलिसीसंदर्भात मोठा निर्णय, आता कर्मचाऱ्यांना मिळणार दर आठवड्याला पगार