LIC Policy : परतावा मिळेल 110 टक्के, दरमहा जमा करा मात्र 63 रुपये

| Updated on: Apr 11, 2022 | 8:38 AM

Bhagya Lakshmi या योजनेचे खास वैशिष्ट्ये हे आहे की, तुम्ही जेवढ्या वर्षासाठी ही पॉलिसी घेता, त्यापेक्षा दोन वर्षे अधिकचे विमा संरक्षण मिळते. या पॉलिसीत कमीतकमी 20 हजार रुपये आणि जास्तीत जास्त 50 हजार रुपये विमा रक्कम ग्राह्य असते.

LIC Policy : परतावा मिळेल 110 टक्के, दरमहा जमा करा मात्र 63 रुपये
भारतीय जीवन विमा महामंडळाने ग्राहकांसाठी भाग्य लक्ष्मी पॉलिसी बाजारात दाखल केली आहे.
Image Credit source: TV9
Follow us on

भारतीय जीवन विमा महामंडळाने (LIfe Insurance Corporation of India) ग्राहकांसाठी भाग्य लक्ष्मी पॉलिसी (LIC Bhagya Lakshmi) बाजारात दाखल केली आहे. ही एक लघुत्तम विमा योजना आहे. यामध्ये विम्याची मिळणारी रक्कम अत्यंत कमी आहे. भाग्य लक्ष्मी पॉलिसी एक मुदत योजना आहे. यामध्ये विमा संरक्षणासोबतच ग्राहकाला जमा रक्कमेवर परतावा मिळतो. या संपूर्ण योजनेत जेवढे हफ्ते तुम्ही भराल, पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर विमाधारकाला 110 टक्के परतावा मिळतो. हा एक लिमिटेड प्रीमियम पेमेंट प्लॅन (Limited Premium Payment Plan) आहे. या योजनेचे खास वैशिष्ट्ये हे आहे की, तुम्ही जेवढ्या वर्षासाठी ही पॉलिसी घेता, त्यापेक्षा दोन वर्षे अधिकचे विमा संरक्षण मिळते. या पॉलिसीत कमीतकमी 20 हजार रुपये आणि जास्तीत जास्त 50 हजार रुपये विमा रक्कम ग्राह्य असते. या योजनेतंर्गत कमीतकमी 5 तर जास्तीतजास्त 13 वर्षांसाठी रक्कम जमा करता येते.

भाग्य लक्ष्मी पॉलिसी घेताना विमाधारकाला विमा मुदतीची निवड करावी लागते. त्यामुळे तुम्हाला किती वर्षासाठी हप्ता भरायचा आहे हे अगोदरच सुनिश्चित होते. ही योजना घेण्यासाठी विमाधारकाचे वय 18 वर्ष असणे आवश्यक आहे. प्रिमियम भरण्याच्या कालावधीवर या पॉलिसीत अधिकत्तम वय मर्यादा ठरविण्यात येते. या योजनेत कमीत कमी 5 वर्षे आणि जास्तीत जास्त 13 वर्षे हप्त्याची निवड करावी लागते. त्याआधारे मिळणारी रक्कम फार मोठी नसते. मात्र एकूण परतावा हा 110 टक्के आहे

या पॉलिसीसीचे वैशिष्ट्ये म्हणजे जेवढ्या वर्षासाठी ही पॉलिसी घेता, त्यापेक्षा दोन वर्षे अधिकचे विमा संरक्षण मिळते. या पॉलिसीत कमीतकमी 20 हजार रुपये आणि जास्तीत जास्त 50 हजार रुपये विमा रक्कम ग्राह्य असते. या योजनेतंर्गत कमीतकमी 5 तर जास्तीतजास्त 13 वर्षांसाठी रक्कम जमा करता येते. या पॉलिसीअंतर्गत विमाधारकाला वार्षिक, सहामाही, तिमाही अथवा मासिक आधारावर रक्कम जमा करता येते. विमा कालावधी पूर्ण झाल्यानंतर विमाधारकाला एकूण 110 टक्के परतावा मिळतो. विमाधारक या पॉलिसी काळात दीर्घायुष्यी राहिला तर कालवधी पूर्ण झाल्यानंतर त्याला 110 टक्के परतावा मिळतो.

एलआयसी भाग्य लक्ष्मी पॉलिसीअंतर्गत कर्ज सुविधा मात्र विमाधारकाला प्राप्त होत नाही. ही पॉलिसी ग्राहकाला सरेंडर करता येते. पण कालावधी पूर्ण होण्याआधीच पॉलिसी बंद करण्याचा निर्णय घेतल्यास ग्राहकाला एकूण प्रिमियमच्या 30 ते 90 टक्के रक्कम परत मिळते. 30 वर्षाच्या विमाधारकाला भाग्यलक्ष्मी पॉलिसीत 20 हजार रुपये विम्यासाठी 13 वर्षांसाठी प्रत्येक वर्षासाठी 756 रुपयांचा हप्ता येतो. म्हणजे महिन्याला मात्र 63 रुपये त्याला चुकते करावे लागतात. ही रक्कम विचारात घेता अत्यंत तोकडी आहे. 13 वर्षात ग्राहकाला 9,823 रुपये मोजावे लागतील. कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याला 15 वर्षांकरीता विमा संरक्षण मिळेल आणि 110 टक्के परताव्याने 10,805 रुपये परतावा मिळेल.

संबंधित बातम्या :

Cardless Cash Withdrawal: डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे कसे काढाल? फॉलो करा या पाच सोप्या स्टेप

ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात वाढ… हे फॅक्टर ठरताय कारणीभूत