आज आपण माहिती घेणार आहोत एलआयसीच्या (LIC) धनरेखा पॉलिसीची (LIC Dhan Rekha) ही पॉलिसी तुम्ही सिंगल प्रिमियम किंवा लिमिटेड प्रिमियमसाठी देखील घेऊ शकतात. या पॉलिसीचे मुख्य वैशिष्ट म्हणजे ही पॉलिसी वेगवेगळ्या कालावधीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या सोविनुसार कालावधीची निवड करू शकता. तुम्हाला जर चांगला परतावा (Refund) हवा असेल तर तुमच्यासाठी एलआयसीची धनरेखा पॉलिसी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या योजनेतंर्गत तुम्ही महिन्याला एक ठरावीक रक्कम भरल्यास तुम्हाला पॉलिसीची मुदत संपल्यानंतर एक चांगला परतावा मिळतो. 13 डिसेंबर 2021 रोजी ही पॉलीस लॉंच करण्यात आली आहे. तुम्ही या पॉलीसीमध्ये दर महिन्याला 50 रुपयांपासून ते साठ हजारांपर्यंची गुंतवणूक करू शकता.
ही पॉलीस समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूयात समजा 35 वर्षांच्या रोहितने 8,75,000 लाखांच्या धनरेखा पॉलिसीची खरेदी केली आणि त्याने पॉलिसीचा कालावधी जर 20 वर्षांचा निवडला असेल तर त्याला केवळ मोजून दहा वर्षच या पॉलिसीचे हफ्ते भरावे लागणार आहेत. रोहितने जर सिंगल प्रीमियमचा ऑपशन निवडला तर त्याला एकदाच 3,84,116 रुपये भरावे लागणार आहेत, रोहीतने जर मंथली प्रियमचा ऑपशन निवडला तर त्याला दहा वर्षांसाठी दर महिन्याला 4,615 रुपये भरावे लागतील. आणि त्याने जर प्रिमियम भरण्यासाठी वर्षाचा ऑपशन निवडला तर त्याला दर वर्षाला दहा वर्षांपर्यंत 54,251 रुपये भरावे लागतील.
तुम्ही या योजनेंतर्गंत जर गुंतवणूक केली तर तुम्हाला अर्ध्या कालावधीसाठीच प्रिमियम भरावा लागतो, म्हणजे तुम्ही जर वीस वर्षांचा कालावधी निवडला असेल तर तुम्हाला केवळ दहा वर्षांसाठीच प्रियम भरावा लागतो. समजा रोहितने जर दहा वर्षांसाठी या योजनेत 3,84,116 रुपये गुंतवले असतील तर त्याला वीस वर्षांनंतर 8 लाख 75,000 हजारांचा परतावा मिळेल.
15 दिवसांत 13 वेळा वाढ, प्रत्येकवेळी 80 पैशांची भर टाकण्यामागचं नेमकं कारण काय? उत्तर मिळालंय!
घर घ्यायचे आहे आता चिंता सोडा; ‘या’ बँका देत आहेत सात टक्क्यांपेक्षाही कमी दराने Home loan
मुंबईत महागाईचा भडका, आज मध्यरात्रीपासून CNG आणि PNG च्या किमतीत मोठी वाढ