LIC चा नवा saral pension प्लॅन लॉन्च, एकदा प्रिमियम जमा केल्यावर आयुष्यभर पेन्शन मिळणार

| Updated on: Jul 02, 2021 | 8:24 AM

LIC पॉलिसी घेताना तुम्हाला एकदाच प्रीमियम भरावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहणार. महत्वाची बाब म्हणजे या प्लॅनमध्ये पॉलिसी सुरु झाल्याच्या तारखेनंतर 6 महिन्यानंतर पॉलिसी होल्डरला कधीही कर्ज मिळू शकणार आहे.

LIC चा नवा saral pension प्लॅन लॉन्च, एकदा प्रिमियम जमा केल्यावर आयुष्यभर पेन्शन मिळणार
LIC पेन्शन प्लॅन
Follow us on

मुंबई : भारतीय जीवन बीमा नियम (LIC) ने गुरुवारी 1 जुलै रोजी सरल पेन्शन (Saral Pension) योजना सुरु केली आहे. ही एक सिंगल प्रिमियम योजना आहे. याचा अर्थ असा की LIC पॉलिसी घेताना तुम्हाला एकदाच प्रीमियम भरावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहणार. महत्वाची बाब म्हणजे या प्लॅनमध्ये पॉलिसी सुरु झाल्याच्या तारखेनंतर 6 महिन्यानंतर पॉलिसी होल्डरला कधीही कर्ज मिळू शकणार आहे. (LIC launches new saral pension plan, once premium is paid, you will get a lifetime pension)

या पेन्शन प्लॅनबाबत माहिती देताना LIC ने सांगितलं की हा एक नॉन लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग, सिंगल प्रीमियम आणि इंडिव्हिज्यूअल इमीडिएट एन्युटी प्लॅन आहे. हा भारतीय विमा महामंडळ आणि विकास प्राधिकरण (IRDAI)च्या मार्गदर्शनक तत्वानुसार सुरु करण्यात आलेला प्लॅन आहे. तसंच या प्लॅनमध्ये सर्व पॉलिसी धारकांसाठी समान नियम असतील.

LIC सरल पेंशन योजना घेण्याचे दोन पर्याय

LIC सरल पेन्शन योजना घेण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहे. पहिला आहे तो लाईफ इन्युटी विथ 100 परसेंट रिटर्न ऑफ परचेस प्राईस. हा पेन्शन सिंगल लाईफसाठी आहे. अर्थात ही पेन्शन कुण्याही एका व्यक्तीशी जोडलेली असेल. तर पेन्शनधारक जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहिल. त्यानंतर त्यांनी पॉलिसी घेण्यासाठी जो बेस प्रीमियमची गुंतवणूक केली होती, तो त्यांच्या नॉमिनीला परत मिळेल. यात कट झालेला टॅक्स परत मिळत नाही.

तर दुसरा प्रर्याय हा जॉईंट लाईफसाठी दिला दातो. यात पेन्शन पती-पत्नी दोघांशी जोडली गेलेली असते. यात पत्नी किंवा पत्नीपैकी जो कुणी जास्त काळ जिवंत राहतो त्याला पेन्शन मिलत राहते. जेवढी पेन्शन एका वक्तीला तो जिवंत असताना मिळेल, तेवढीच पेन्शनची रक्कम तो व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्याच्या जीवनसाथीला मिळेल. जेव्हा या दोघांचाही मृत्यू होईल, तेव्हा नॉमिनीला बेस प्राईस दिली जाते ती पॉलिसी घेताना जमा केली गेलेली असते.

पॉलिसी घेतल्यानंतरच पेन्शन सुरु होणार

LICची ही योजना इमीडिएट एन्युटी प्लॅन आहे. पॉलिसी घेतल्यानंतर लगेच त्याला पेन्शन सुरु होईल. इमीडिएट एन्युटीला तुम्ही इमीडिएट पेंशन ही म्हणू शकता. विशेष बाब म्हणजे हे तुमच्यावर अवलंबून आहे की, तुम्हाला पेन्शस प्रत्येक महिन्याला हवी की तिमाही. त्यानुसार तुम्हाला पेन्शन प्लॅन निवडावा लागणार आहे. जर प्रत्येक महिन्याची निवड केली तर एक महिन्यानंतर, तिमाहीत 3 महिन्यानंतर तर सहामाही आणि वार्षिक असाही पर्याय उपलब्ध आहे.

इतर बातम्या :

PF अकाऊंट ट्रान्सफर करताता ‘या’ गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा अर्धेच पैसे येतील

सोन्यातील गुंतवणुकीची उत्तम संधी, दर घसरल्याने मोठ्या फायद्याचे संकेत, आजचा दर किती?

LIC launches new saral pension plan, once premium is paid, you will get a lifetime pension