मुंबई: सप्टेंबर 12 दिवस बँका बंद राहणार (Bank Holiday in August) आहेत. या महिन्यात अनेक राष्ट्रीय आणि स्थानिक सण, उत्सव असल्यामुळे बँका जवळपास 12 दिवस बंद राहणार आहेत. या सुट्ट्या लक्षात घेऊन नागरिकांना आपल्या आर्थिक कामांचे नियोजन करावे लागणार आहे. सध्याच्या काळ हा डिजिटल व्यवहारांचा असला तरी काही कामांसाठी आपल्याला बँकांवर अवलंबून राहावे लागतेच. त्यामुळे तुम्हाला बँकेशी संबंधित काही काम किंवा बँकेतून मोठी रक्कम काढायची असेल त्यादृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे.
* 5 सप्टेंबर- रविवार
* 8 सप्टेंबर – प्रकाश उत्सव श्री गुरु ग्रंथ साहेब जी. पंजाबमध्ये या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. (स्थानिक सुट्टी)
* 9 सप्टेंबर- सुहाग पर्व तीज (स्थानिक सुट्टी)
* 10 सप्टेंबर- गणेश चतुर्थी (स्थानिक सुट्टी)
* 11 सप्टेंबर- महिन्यातील दुसरा शनिवार असल्याने बँका बंद असतील.
* 12 सप्टेंबर- रविवार
* 17 सप्टेंबर- कर्मा पूजा (स्थानिक सुट्टी)
* 19 सप्टेंबर- रविवार
* 20 सप्टेंबर- इंद्र जत्रा (स्थानिक सुट्टी)
* 21 सप्टेंबर- नारायण गुरु समाधी दिवस (स्थानिक सुट्टी)
* 25 सप्टेंबर- महिन्यातील चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.
* 26 सप्टेंबर- रविवार
आजपासून बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. आता बँका थेट 1 सप्टेंबरला उघडतील. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आलेल्या सणांमुळे बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. यापैकी आज चौथा शनिवारी आणि उद्या रविवार असल्यामुळे बँका बंद असतील. तर गोकुळाष्टमी असल्याने 30 आणि 31 तारखेला देशाच्या विविध भागांत बँका बंद राहतील.
गोकुळाष्टमीच्या दिवशी सर्वच राज्यांमध्ये बँका बंद नसतील. संबंधित प्रदेशानुसार प्रत्येक राज्यात वेगवेगळे नियम लागू असतील. रिझर्व्ह बँकेकडून स्थानिक सणांनुसार प्रत्येक राज्यात सार्वजनिक सुट्ट्या निश्चित केल्या जातात. भारतातील अनेक राज्यांमध्ये कृष्णजन्म किंवा गोकुळाष्टमीचा सण उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे 30 तारखेला अहमदाबाद, चंदीगढ, चेन्नई, देहरादून, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनऊ, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर आणि गंगटोकमध्ये बँका बंद असतील. तर इतर राज्यांमध्ये 31 ऑगस्टला बँक हॉलिडे असेल.
संबंधित बातम्या:
PHOTO: ATM मशीनमधून फाटलेली नोट मिळाली, कशी बदलून घ्याल?
कन्याकुमारी, रामेश्वरमसह आणखी 6 शहरांत फिरण्याची संधी, जाणून घ्या IRCTC च्या टूर पॅकेजबाबत
गॅस एजन्सी तुमच्याकडून सिलेंडरचे जास्त पैसे घेतेय, कुठे तक्रार कराल?