मुंबई : ओला इलेक्ट्रिकने नुकतीच इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात पहिली इलेक्ट्रिक स्कूटर ओला एस 1 सादर केली. या स्कूटरची किंमत 99,999 (एक्स-शोरूम) पासून सुरू होईल. बुकिंग आधीच सुरू झाली आहे पण त्याची डिलिव्हरी ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होईल. ओलाने ओला ई-बाइक खरेदी करण्यासाठी कर्ज देऊन ग्राहकांना मदत करण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांशी हातमिळवणी केली आहे. यासाठी ओलाने एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा प्राइम आणि टाटा कॅपिटलशी करार केला आहे. (Loans for Ola e-scooters will be readily available, starting from EMI 2999)
ओला एस 1 इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांना दोन प्रकारांमध्ये उपलब्ध होईल – एस 1 आणि एस 1 प्रो, ज्याची किंमत अनुक्रमे 99,999 आणि 1,29,999 रुपये आहे. ओला कंपनीचे म्हणणे आहे की ही आतापर्यंतची सर्वोत्तम स्कूटर आहे, ज्यात उत्तम डिझाईन, कामगिरी आणि तंत्रज्ञान आहे. ओलाचे लक्ष भारतातील ई-बाइक बाजारावर तसेच जागतिक बाजारपेठांवर आहे. जर त्याला भारतात चांगले यश मिळाले तर कंपनी आपला बाजार अनेक देशांमध्ये पसरवेल.
ओलाच्या म्हणण्यानुसार, ज्या बँकांसोबत कर्ज करार झाला आहे, त्यापैकी बहुतेक बँकांचे काम 8 सप्टेंबरपासून सुरू होईल. उर्वरित बँकाही लवकरच कर्ज सुविधा सुरू करतील. या कामासाठी ओलाने जवळपास सर्व मोठ्या आणि छोट्या बँकांशी करार केला आहे. यामध्ये लहान बचत बँकांचाही समावेश आहे. बँक ऑफ बडोदा, अॅक्सिस बँक, आयडीएफसी बँक, इंडसइंड बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक, जन स्मॉल फायनान्स बँक आणि येस बँक या यादीत समाविष्ट आहेत. ओलाने म्हटले आहे की स्कूटर विक्रीचे संपूर्ण काम ऑनलाईन ठेवण्यात आले आहे आणि ते शक्य तितके सोपे केले गेले आहे. अगदी कर्जाची सुविधा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरच दिली जाईल. ग्राहकाला कागदोपत्री कोणत्याही त्रासात जाण्याची गरज नाही.
कर्जाचा ईएमआय 2,999 रुपयांपासून सुरू होतो. ओलाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या बँकांकडून कर्जाच्या ऑफर दिसतील. या ऑफर्स पाहून ग्राहक स्कूटर सहज खरेदी करू शकतील. कंपनीच्या मते, ज्या लोकांनी आधीच स्कूटर बुक केली आहे ते 8 सप्टेंबरनंतर स्कूटरसाठी पैसे देणे सुरू करू शकतात. त्यांच्या वाहनाचे मॉडेल अंतिम केल्यानंतर ग्राहक ई-स्कूटर निवडून पैसे देऊ शकतात. यानंतर लगेच वितरण सुरू होईल. ग्राहक त्यांच्या पसंतीच्या स्कूटरचा रंग देखील निवडू शकतात.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, सर्वकाही निश्चित झाल्यानंतर ऑक्टोबरपासून ओला स्कूटरची डिलिव्हरी लोकांच्या घरी सुरू केली जाईल. ज्यांनी आधीच बुक केले आहे त्यांना डिलिव्हरी दिली जाईल आणि जे नंतर बुक करतात त्यांच्यासाठी काही प्रतिक्षा कालावधी असू शकतो. कंपनीने या कालावधीबद्दल अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही. ओला कंपनीने जुलै महिन्यात बुकिंग सुरू केले आणि यासाठी 499 रुपये शुल्क ठेवण्यात आले. 24 तासांत ओलाला 1 लाखांहून अधिक ऑर्डर मिळाल्या. सध्याच्या तारखेपर्यंत ओलाला किती ऑर्डर मिळाले हे अद्याप उघड झालेले नाही. कंपनीने म्हटले आहे की सुरुवातीला दरवर्षी 10 लाख स्कूटर विकले जातील आणि नंतर त्याची संख्या वाढवली जाईल. (Loans for Ola e-scooters will be readily available, starting from EMI 2999)
धुळ्यात दरोडेखोरांचा दिवसाढवळ्या सुळसुळाट, तरुणाला नव्या कोऱ्या दुचाकीवरुन उतरवलं, हत्या केली, नंतर…https://t.co/V5QJUggMmA#Crime #CrimeNews #Murder
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 6, 2021
इतर बातम्या
Tesla लवकरच स्वस्तातली इलेक्ट्रिक कार लाँच करणार, फीचर्सही दमदार
मोबाईलच्या नादात शिक्षकाने जीव गमावला, चंद्रपूरच्या मूल शहरातील धक्कादायक घटना