देशातील प्रमुख खाद्यतेल उत्पादक कंपन्यांनी (edible oil manufactured companies) तेलाच्या किंमती कमी केल्या आहेत. या कंपन्यांनी पाम, सूर्यफुल आणि सोयाबीन तेलाच्या किंमतीत प्रति लिटर 20 रुपयांची कपात (Price reduce) केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत कपात झाल्यानंतर नवीन दर लवकरच लागू होतील. प्रमुख खाद्यतेल उत्पादक कंपन्या अदाणी विल्मर आणि रुची इंडस्ट्रीज (Ruchi Industries) यांच्यासह जेमिनी एडिबल्स अँड फॅट्स इंडिया, मोदी नॅचरल्स, गोकुळ री-फॉयल अँड सॉल्वेंट, विजय सॉल्वेक्स, गोकुळ अॅग्रो रिसोर्सेज आणि एन. के. प्रोटीन या तेल उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या दरात कपात केली आहे. ही कपात सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे. किचन बजेटमध्ये गृहिणींना आणि हॉटेल चालकांना दिलासा मिळणार आहे. आज तेल दरात कपात जाहीर करण्यात आली असली तरी येत्या एक दोन आठवडयात नवीन दराचे फायदे सर्वसामान्यांना मिळतील.
पाम तेलाच्या किंमतीत प्रति लिटर 7 ते 8 रुपयांची घसरण झाली. सूर्यफुल तेलाच्या किंमतीत 10 ते 15 रुपये प्रति लिटर तर सोयाबीन तेलाच्या किंमतीत 5 रुपये प्रति लिटर कपात करण्यात आल्याची माहिती इंडियन वेजिटेबल ऑयल प्रोडयुसर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर राव यांनी दिली. किंमतीत घसरण झाल्याने तेलाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. किंमती घसरण्याचा थेट फायदा किरकोळ बाजारात दिसून येईल. महागाई कमी होईल. खाद्यतेल श्रेणीत मे महिन्यात 13.26 टक्के महागाई दिसून आली होती. त्यामागचे कारण गेल्या एका वर्षात खाद्यतेलाच्या घरगुती किंमतीत वाढ झाली होती, हे होते.
हैदराबाद येथील कंपनी जेमिनी एडिबल्स अँड फॅट कंपनीने गेल्या आठवडयातच त्यांच्या फ्रीडम सनफ्लावर तेलाच्या एक लिटर पाऊचच्या एमआरपीमध्ये 15 रुपयांची कपात केली होती. आता तेलाच्या किंमती 220 रुपये आहे. आता या आठवडयात तेलाच्या किंमती 20 रुपयांनी आणखी घसरल्यावर एक लिटरचे पाऊच 200 रुपयांना मिळेल.
दक्षिण भारतीय राज्यांसह ओडिशात सूर्यफुलाचा बोलबाला आहे. या राज्यात सूर्यफुलाच्या तेलाचा एकूण वापर 70 टक्के इतका आहे. तेलाचा पुरवठा वाढला आहे. आणि जागतिक बाजारात तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. तरीही अद्याप या किंमती कोविड पूर्व काळातील किंमतीशी साधार्म्य धरून नसल्याची माहिती जेमिनी एडिबल्स अँड फॅटचे वरिष्ठ उपाध्यक्ष पी. चंद्रशेखर रेडडी यांनी दिली. क्रुड सनफ्लावर तेलावरील शुक्ल कपातीमुळे सूर्यफुलाच्या तेलाच्या किंमती कमी होण्यास मदत होणार आहे. याव्यतिरिक्त गेल्या काही आठवडयात अर्जेटिना आणि रुस या देशातून सूर्यफुल तेलाचा पुरवठा करण्यात येत आहे.