न्यूयॉर्क : संगणकात आणखी एक नवीन क्रांती होणार आहे. या क्रांतीमुळे माऊस, कीबोर्ड प्रमाणे हे टूल सक्तीचे होणार आहे. हे टूल या दशकातील सर्वात शक्तिशाली टूल ठरणार आहे. Microsoft ने हे टूल लॉन्च केले आहे. या टूलमुळे अनेक तासांचे काम काही सेंकदात होणार आहे. मायक्रोसॉफ्टने या टूलला Copilot नाव दिले आहे. या टूलमुळे कार्यालयीन कामात क्रांती होणार आहे. Microsoft चे सीईओ सत्या नडेला यांनी एका कार्यक्रमात हे टूल लॉन्च केले. या टूलमध्ये तुमचे जीवन अधिक सुलभ होणार असल्याचा दावा सत्या नडेला यांनी केला आहे.
काय आहे हे टूल
Co pilot हे टूल म्हणजे काय, ते कसे कार्य करते आणि या टूलमुळे तुमचे जीवन कसे बदलणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहू या. यासाठी Copilot टूलचे एक उदाहरण समजून घेऊ या.
तुम्ही एखाद्या कार्यालयात काम करता आणि बॉसला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्यायचे असते, किंवा तुम्हाला कुठेतरी नोकरी हवी आहे, त्यासाठी तुम्हाला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करावे लागणार आहे. मग या कामांसाठी तुमचे तीन चार तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ जाणार आहे. परंतु हे टूल तुमचे काम काही सेंकदात करणार आहे. पॉवर पॉईंट स्लाइड्समध्ये काय लिहायचे, कोणते डिझाइन ठेवावे, कोणते अॅनिमेशन ठेवावे, कोणते टेम्पलेट निवडायचे, कोणते फोटो टाकायचे, अॅनिमेशन कसे वापरायचे, इत्यादी… हे सर्व काही सेकंदात होणार आहे. अन् हे सर्व Copilot करणार आहे. तुम्हाला फक्त त्याला कमांड द्यावी लागणार आहे. त्यानंतर तुमचे काम काही सेकंदात पूर्ण होईल.
Microsoft ने नुकतेच एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात कंपनीचे सीईओ सत्या नडेला (Satya Nadella) यांनी Copilot या टूलसंदर्भात माहिती दिली. त्यांनी म्हटले की, Copilot लोकांची अवघड कामे क्षणात पूर्ण व्हावीत अशी रचना या टूलची केली आहे.
संगणकात हे टूल होणार सक्तीचे
सत्या नाडेला यांनी असे म्हटले आहे की, ज्याप्रमाणे सध्या संगणकात कीबोर्ड, माऊस सक्तीचे झाले आहे, त्याशिवाय काम करु शकत नाही, तसेच भविष्यात Copilot टूलसंदर्भात होणार आहे. याशिवाय संगणकावर काम करता येणार नाही. म्हणजे संगणकासाठी कीबोर्ड आणि माऊसप्रमाणे Copilot आवश्यक बाब होणार आहे.
Microsoft 360 Copilot कंपनीचा हा टूल Microsoft Office 365 च्या सर्व प्रोडक्ट्ससोबत मिळणार आहे. Ms Word, Ms Excel, PowerPoint व Outlook सारखा मायक्रोसॉफ्टच्या प्रोडक्ट्समध्ये Copilot चा सपोर्ट देण्यात येणार आहे.
Copilot चा वापर फक्त पॉवर पाइंटसाठीच होणार नाही तर Ms Excel मध्ये SOWT Analysis करण्याचे काम असो की, Excel मध्ये चार्ट तयार करणे किंवा ग्राफ बनवण्याचे काम असो सर्व काही सेंकदात होणार आहे.