मोबाईल सिमकार्डच्या नियमांत बदल, जाणून घ्या सर्वकाही
Mobile Sim Card | दूरसंचार कंपन्या डिजिटल माध्यमातून हा फॉर्म भरू शकतील. सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता दिली आहे. आतापासून जर तुम्हाला नवीन मोबाईल नंबर किंवा टेलिफोन कनेक्शन घ्यायचे असेल तर तुमचे केवायसी पूर्णपणे डिजिटल होईल.
-
-
-
-
भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटीकडून (UIDAI) उपलब्ध करुन देण्यात आलेल्या या सुविधेमुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. आधार कार्डावरील मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, ई-मेल, पत्ता आणि छायाचित्र करण्यासाठी कोणतीही ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे तुम्हाला आधार कार्डावरील छायाचित्र बदलायचे असल्यास प्रत्यक्ष आधार केंद्रावर जावे लागेल. टपाल कार्यालयातही ही सुविधा उपलब्ध आहे.
-
-
सध्याच्या नियमांनुसार, जर एखाद्या ग्राहकाने आपला प्रीपेड नंबर पोस्टपेड किंवा पोस्टपेडमध्ये प्रीपेडमध्ये बदलला, तर त्याला प्रत्येकवेळी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. पण आता केवायसी फक्त एकदाच करावे लागेल.
-
-
केवायसीसाठी ग्राहकांकडून काही कागदपत्रे मागितली जातात. जरी हे काम तुम्ही ज्या ठिकाणी सिम घेत आहात त्या ठिकाणी जाऊन करावे लागते, परंतु तुम्ही स्वतः ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कागदपत्रे अपलोड करून तुमचे केवायसी करता, तर त्याला सेल्फ केवायसी म्हणतात. हे वेबसाइट किंवा अॅपद्वारे होईल.