धक्कादायक ! 10 वर्षांत भारतात 1059 वाघांचा मृत्यू, मध्य प्रदेशात सर्वाधिक आकडा

| Updated on: Jul 29, 2022 | 11:36 AM

भारतात गेल्या 10 वर्षांत 1059 वाघांचा मृत्यू झाला झाल्याची माहिती समोर आली आहे. शिकारी व्यतिरिक्त वाघांच्या मृत्यूची इतर कारणं अद्याप अज्ञात आहेत. मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक, 202 वाघांचा मृत्यू झाला आहे.

धक्कादायक ! 10 वर्षांत भारतात 1059 वाघांचा मृत्यू, मध्य प्रदेशात सर्वाधिक आकडा
World tiger Day
Image Credit source: twitter
Follow us on

भारताचा राष्ट्रीय प्राणी असणारा, एकाच डरकाळीत भल्याभल्यांना गारद करणारा वाघ ( National Animal Tiger) पाहून कोणाचाही थरकाप उडतो. मात्र देशातील वाघांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून गेल्या दशकभरात तब्बल 1059 वाघ मृत्यूमुखी ( 1059 Tigers died in last 10 years)पडल्याची माहिती समोर आली आहे. शिकारी व्यतिरिक्त वाघांच्या मृत्यूची इतर कारणं अद्याप अज्ञात आहेत. 2022 साली आत्तापर्यंत 75 वाघ मृत्यू पावले असून (In 2022 75 tigers have died), 2021 साली हा आकडा 127 इतका होता. वाघांच्या मृत्यू संख्येत मध्यप्रदेश ( with total number 202 deaths, madhya paradesh on top in tiger’s death) पहिल्या स्थानी असून तेथे दशकभरात तब्बल 202 वाघ मरण पावले आहेत. वाघांचे भ्रमणमार्ग भक्कम करूनच हा प्रश्‍न सोडवता येऊ शकतो, असे मत तज्ज्ञांनी मांडले आहे

राज्यांनी दिलेल्या डेटानुसार, भारतात वाघांचा सर्वात जास्त मृत्यू मध्यप्रदेशमध्ये (202) झाला आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानी महाराष्ट्र (141) आहे. कर्नाटकमध्ये 123, उत्तराखंड 93, तामिळनाडू 62, आसाम 60, केरळमध्ये 45 तर उत्तर प्रदेशमध्ये 44 वाघांचा गेल्या दशकभरात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

National Tiger Conservation Authority म्हणजेच NTCA द्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतात सध्या 2967 वाघ आहेत. त्यापैकी तब्बल 526 वाघ हे एकट्या मध्य प्रदेश राज्यात आहेत. भारतात प्रत्येक दशकात 10 ते 15 हजार वाघ जन्म घेतात तर दरवर्षी 1500 वाघांचा जन्म होतो. मात्र बदलत्या तापमानाशी जुळवून न घेऊ शकल्याने त्यापैकी 70 टक्के वाघ मृत्यू पावतात.

हे सुद्धा वाचा

कशी होते वाघांची गणना ?

वाघांच्या निगराणीसाठी भारतात मोठ्या स्तरावर काम केले जाते. 3.81 लाख वर्ग किलोमीटर क्षेत्रात वाघांचा शोध घेतला जातो. त्यासाठी तब्बल 141 ठिकाणी 26,838 हजार कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

देश व राज्यात व्याघ्र संवर्धन मोहीम वेगवान झाली असली तरी वाघांचे शत्रू ओळखून त्यावर अंकुश घालणे गरजेचे आहे. व्याघ्र संख्या वृद्धिंगत होत असतानाच शिकारी व अन्य काही कारणांमुळे होत असलेले वाघांचे मृत्यू नियोजनातील उणीवा दर्शवत आहेत.

गेल्या पाच वर्षांतील देशातील व्याघ्र मृत्यू संख्या

वर्ष 2017 – 116 वाघांचा मृत्यू, वर्ष 2018 – 102 वाघांचा मृत्यू, वर्ष 2019 – 95 वाघांचा मृत्यू, वर्ष 2020 – 106 वाघांचा मृत्यू, वर्ष 2021-127 वाघांचा मृत्यू, वर्ष 2022- आत्तापर्यंत 75 वाघांचा झाला मृत्यू.