मुंबई : नवं आर्थिक वर्षात (Economic Year) महागाईची गुडी उभारल्या गेली आहे. परिणामी सण-उत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. 1 एप्रिल रोजी नवीन वर्ष म्हणजेच देशाचे नवे आर्थिक वर्ष सुरू होत आहे. पगारदार वर्गासह सर्व सामान्यांना या बदलांना सामोरे जावे लागणार आहे. आजपासून इन्कम टॅक्सच्या (Income tax) नियमांमध्ये आणखी एक मोठा बदल झाला आहे. तर इतर अनेक नियमांत बदल झाले आहे. क्रिप्टोकरन्सीतून (Cryptocurrency) कमाईच्या अनेकांच्या स्वप्नाला आता सुरुंग लागणार आहे. सरकार क्रिप्टोच्या (Crypto) उत्पन्नावर 30 टक्क्यांपर्यंत कर आकारणार आहे. तर टीडीएस एक टक्का अदा करावा लागणार आहे. तर औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्व सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे पाडव्याला आनंदाची नाही तर नियोजनाची गुढी उभारावी लागेल.
क्रिप्टोवर कर
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारी महिन्यात सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. त्याच्या तरतुदी आजपासून देशात लागू होणार आहेत. सर्वात जास्त चर्चा केली जाते ती क्रिप्टोकरन्सीवरील कराची . आजपासून क्रिप्टो व्यवहारांवर जे काही उत्पन्न असेल त्यावर सरकार 30 टक्क्यांपर्यंत अर वसूल करेल. सरकार 1 जुलैपासून अशा व्यवहारांवर 1% टीडीएस आकारण्यास सुरुवात करणार आहे.
पीएफ खात्यावरील कर
आजपासून इन्कम टॅक्सच्या नियमांमध्ये आणखी एक मोठा बदल होणार आहे. हे नियम तुमच्या पीएफ खात्यातील बचतीशी संबंधित आहेत. नव्या नियमानुसार तुमच्या पीएफ खात्यात वार्षिक अंशदान अडीच लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. तर यापेक्षा जास्त योगदान देणाऱ्यांना उर्वरित रकमेवर कर भरावा लागणार आहे. याचा परिणाम सर्वाधिक खासगी नोकरी असलेल्या, ज्यांचा पगार जास्त आहे, अशांवर होणार आहे.
औषधी महागली
डोकेदुखीपासून तापापर्यंत प्रत्येक गोष्टीत वापरण्यात येणारे पॅरासिटामोल औषध आजपासून महागणार आहे. वास्तविक, घाऊक किंमत निर्देशांकात झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता सरकारने सुमारे 800 औषधांच्या किंमतीत 10.7 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत असलेल्या औषधांचा समावेश आहे. या औषधांचा वापर ताप, संसर्ग, हृदयरोग, उच्च रक्तदाब, त्वचारोग आणि अशक्तपणाच्या उपचारांमध्ये केला जातो आणि त्यात पॅरासिटामॉल, फेनोबार्बबिटोन, फेनिटोइन सोडियम, अझिथ्रोमाइसिन, सिप्रोफ्लोक्सासिन हायड्रोचा समावेश आहे.
कोणत्या क्षेत्रावर परिणाम दिसणार?
जर व्याजदर वाढले तर महागाईच्या झळांपासून एकही क्षेत्र सूटणार नाही. प्रत्येक क्षेत्राला त्याचा परिणाम भोगावा लागेलच. परंतु, प्रत्येकावर सारखाच परिणाम होईल असे नाही. उदाहरणार्थ, व्याज-आधारित बँकिंग, एनबीएफसी, रिअल्टी, कॅपिटल गुड्स आणि ऑटो क्षेत्र यावर त्याचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. दुसरीकडे, एफएमसीजी क्षेत्रावर सर्वात कमी परिणाम झाला आहे. कधीकधी इष्टापती होते, तसेच सध्या देशात सुरु आहे. देशाचे सकल उत्पन्न वाढ जोरात आहे, अनेक कंपन्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारात दमदार कामगिरी करत आहेत. त्यांचे आर्थिक पासबूक मजबूत पातळीवर आहे.
संबंधित बातम्या