नवी दिल्ली : Income Tax on Gifts ख्रिसमसचा उत्सव आणि नव वर्षाचे सेलिब्रेशन जवळ आले आहे. हे दोनही तसे मोठे उत्सव मानले जातात. ख्रिसमस आणि नववर्षाच्या निमित्ताने आपण पाहुण्यांना किंवा मित्रांना काही गिफ्ट देत असतो, तर काही जण आपल्याला देखील गिफ्ट देत असतात. परंतु असे देखील काही गिफ्ट असतात ज्यावर आपल्याकडून इनकम टॅक्स आकारला जाऊ शकतो. गिफ्ट देण्या-घेण्याच्या बाबतीमध्ये इनकम टॅक्सचा नियम काय सांगतो? कोणत्या गिफ्टवर टॅक्स आकारला जाऊ शकतो हेच आपण या लेखामधून जाणून घेणार आहोत.
असे काही गिफ्ट असतात ज्यावर टॅक्स आकारला जात नाही, मग त्याची किंमत कितीही असो ते टॅक्स फ्री असतात. त्यामध्ये पुढील गिफ्टचा समावेश होतो. नातेवाईकांकडून मिळालेल्या गिफ्टवर टॅक्स आकारला जात नाही, अशा नातेवाईकांमध्ये बायको आणि आई -वडिलांचा समावेश होतो. तसेच तुमच्या लग्नवेळी देण्यात येणाऱ्या गिफ्टवर देखील कोणताही टॅक्स लागत नाही. तुम्हाला जर एखादे गिफ्ट हे वारसहक्काने मिळणार असेल तर ते देखील टॅक्स फ्री असते. एखाद्या व्यक्तीला आपल्या मृत्यूची कल्पना आली असेल आणि त्याची जर एखाद्या व्यक्तीला गिफ्ट देण्याची इच्छा असेल तर त्याच्यावर देखील टॅक्स आकारला जात नाही.
जर तुम्हाला एका वित्त वर्षामध्ये कोणी पन्नास हजारांपेक्षा अधिक रक्कम गिफ्ट म्हणून दिल्यास त्या रकमेवर कर लागतो. कोणी एखादे घर,जागा किंवा संपत्ती गिफ्ट दिल्यास त्यावर देखील कर आकारला जातो. तसेच सर्व मौल्यवान धातू आणि शेअर ज्यांची किंमत ही पन्नास हजारांपेक्षा जास्त आहे, अशा सर्व गोष्टींवर कर आकारला जातो.
ईपीएफओकडून 23.44 कोटी खात्यांवर व्याज जमा; ‘असे’ चेक करा आपले बॅलन्स
एफडी ही फायद्याची, जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळेल सर्वोत्तम परतावा