रविवारी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले. देशावर शोककळा पसरली. देशात दुखवटा पाळण्यात येत आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्वांच्या कारकिर्दीत लता दिदींच्या सुरांनी भारतासह जगाला मोहिनी घातली. त्यांच्या जाण्याने सूर पोरके झाले. संगीत क्षेत्राचीच नव्हे तर राष्ट्राची अपरिमीत हानी झाली. या घटनेमुळे 7 फेब्रुवारी रोजी सरकारने सुट्टी जाहीर (Government Declared Holiday) केली आहे. रिझर्व्ह बँकेने जाहीर केल्याप्रमाणे ही कामे होऊ शकणार नाहीत, राज्य सरकारने परक्राम्य संहिता अधिनियम (Negotiable Instrument Act,1881) कलम 25 नुसार ही सुट्टी जाहीर केली आहे. देशात दुखवटा असल्याने आणि गान कोकिळेच्या सन्मानार्थ ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सरकारी सिक्युरिटीज, परकीय चलन, मनी मार्केट आणि रुपी व्याजदर डेरिव्हेटिव्ह्जमध्ये कोणतेही व्यवहार किंवा सेटलमेंट 7 फेब्रुवारी रोजी होऊ शकणार नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची ((MPC) बैठक सोमवार,7 फेब्रुवारीपासून सुरू होणार होती, ती आता 8 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
राज्य सरकारने परक्राम्य संहिता अधिनियम (Negotiable Instrument Act,1881) कलम 25 नुसार ही सुट्टी जाहीर केली आहे.. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेने अधिसूचना काढली असून. 7 फेब्रुवारी रोजी कोणकोणते कामकाज होणार नाही, याची माहिती जाहीर केली आहे. आरबीआयच्या अधिसूचनेनुसार, 7 फेब्रुवारी रोजी सरकारी सिक्युरिटीज, परकीय चलन, मनी मार्केट आणि रुपी व्याज दर डेरिव्हेटिव्ह्जमध्ये कोणतेही व्यवहार किंवा सेटलमेंटला परवानगी दिली जाणार नाही. अधिसूचनेनुसार ही सर्व कामे दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
एमपीसीची बैठक 8 फेब्रुवासरी रोजी होईल
रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची ((MPC) बैठक सोमवार, 8 फेब्रुवारी रोजी सुरू होणार होती, या घटनेमुळे आजपासून सुरु होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही बैठक 8 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 10 फेब्रुवारीपर्यंत ही बैठक चालणार आहे. अर्थसंकल्पानंतर लगेचच होणारी एमपीसीची ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. लता दिदींच्या अचानक जाण्याने सोमवारी होणारी ही बैठक मंगळवारी सुरु होईल आणि गुरुवारपर्यंत चालेल. महाराष्ट्रात 7 फेब्रुवारीला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट,1881 च्या कलम 25 अन्वये लता मंगेशकर यांचा सन्मान करत सुट्टी जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 च्या कलम 45झेडआय (4) अन्वये ही धोरण निश्चित करणा-या समितीची बैठक तहकूब करून उद्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.